नेवासा येथुन गव्हासह चोरी गेलेला आयशर १४,८८,८६४ रुपये किं.च्या मुद्येमालासह दोन आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

संतोष औताडे (मुख्य संपादक-नेवासा) दिनांक- 06/10/2022
प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, दिनांक ०३/१०/२०२२ रोजी यातील फिर्यादी सुनिल रमेश खिरडकर वय २७ धंदा चालक रा. मोरेचोक, औरंगाबाद मुळ रा. जातेगांव, ता. नांदगांव जि. नाशिक यांनी फिर्यादी दिली को. मी दि. ०२/१०/२०२२ रोजी लासूर स्टेशन, जि. औरंगाबाद येथून १० टन ६०० कि. गव्हाच्या बॅग भरुन अहमदनगरकडे जात असतांना सायंकाळी ०६/३० वा. चे सुमा खडका फाटा ते नेवासा फाटा रोडवर टोलनाक्याचे पुढे सुमारे १ कि.मी. अंतरावर ०३ अज्ञात इसमांनी आम्ही फायनान्स कंपनीचे लोक आहोत असे सांगुन मला गाडीचे खाली उतरुन लाथाबुक्याने मारहाण व शिवीगाळ करुन माझे ताब्यातील लेलंड आयशर कंपनीची गाडी एम.एच.२० ई.जी. ८१६१ व त्यामधील १० टन ६०० कि. गहु असा एकुण १४,८८,८६४/- रु. कि. मुझेमाल बळजबरीने चोरुन घेऊन गेले. वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन नेवासा पो.स्टे. गुरनं ८४९/२०२२ भादविक. ३९२, ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचे तपासाबाबत मा. श् अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेऊन अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दिनकर मुंढे, सफी. मनोहर शेजवळ, हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके,पोलीस नाईक संदीप दरंदले, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, दिलीप शिंदे, विशाल दळवी, चापोहेकॉ संभाजी कोतकर, चापोना भरत बुधवंत यांचे पथक तयार करुन वरील पथकासह घटनास्थळी भेट दिली. व सदर गुन्हयाच्या समांतर तपासास सुरुवात केली.अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी फिर्यादीकडे आयशर गाडी व चोरीस गेलेल्या गव्हाच्या बँग बाबत सखोल व बारकाईने चौकशी करून घटनास्थळाची फिर्यादी व टेम्पो मालकासह यांचेसह घटनेची पडताळणी केली असता फिर्यादीने संगितलेल्या हकिकतमध्ये विसंगतो निदर्शनास आली.
त्या संदर्भाने पथकाने घटनास्थळ व मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज तपासणी व तांत्रिक विश्लेषण करुन सदरचा गुन्हा हा फिर्यादीने फिर्यादमध्ये नमुद केल्याप्रमाणे घडला नसून फिर्यादीनेच सदर मालाची विल्हेवाट लावली असावी अशा संशय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना आल्याने त्यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना फिर्यादी सुनिल रमेश खिरडकर यास ताब्यात घेऊन त्याचेकडे सखोल व बारकाईने तपास करणेबाबत आदेश दिले. पथकाने फिर्यादीस ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपूस करता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेऊन सखोल बारकाईने चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा घडलेला नसून मी व टेम्पो मालक बाबासाहेब बबन हिरे रा. बहिरगांव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद अशांनी आयशर टेम्पोचे फायनान्सची रक्कम टेम्पोच्या किमतीपेक्षा जास्त झाली होती व टेम्पोमालकाकडे फायनान्सची रक्कम भरण्यासाठी पैसे नव्हते म्हणून चोरीचा बनाव करून मी टेम्पो मालक बाबासाहेब बबन हिरे यांचे सांगण्यावरुन आयशर टेम्पो हा गव्हासह कृष्णराज पेट्रोलियम प्रा.लि. पानपोई फाटा. वनद्रा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद येथे लावून चोरीचा बनाव करुन नेवासा पो.स्टे. येथे फिर्याद दिली आहे असे सांगितलं.वरील प्रमाणे चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादीत इस्सर पेट्रोलपंपाजवळ, पानपोई, ता. कन्नड जि. औरंगाबाद या ठिकाणी जाऊन खात्री केली असता गुन्हयातील आयशर मो १२,००,०००/- रुपये व त्यामधील गव्हाच्या २०२ बॅग किं.रुपये २.८८.८६४ / असा एकूण १४.८८.८६४/- किमतीच्या मुद्देमालासह मिळुन आल्याने. आरोपी नामे (१) सुनिल रमेश खिरडकर वय २७ रा. मोरे चौक, औरंगाबाद रा. जातेगांव, ता.नांदगांव, जि. नाशिक (२) बाबासाहेब वचन हिरे वय ४७ रा. बहिरगांव, ता. कन्नड जि. औरंगाबाद यांन ताव्यात घेऊन मुद्देमालासह नेवासा पो.स्टे. ला हजर केले. पुढील कारवाई नेवासा पो.स्टे. करीत आहेत.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक, बी.जी शेखर पाटील ,जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर,
उप विभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर अतिरीक्त कार्यभार विभाग शेवगांव संदीप मिटके यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
 
				 
					 
						


