
संतोष औताडे (मुख्य संपादक ) दिनांक-14 आॅगस्ट 2022.
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे अपघातात निधन.
मुंबई -पुणे एक्पेस हायवेवर विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात विनायक मेटे जखमी झाले होते. त्यांना तातडीने पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती समोर आली आहे. घटनास्थळाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
विनायक मेटे हे आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री बीडहून मुंबईला रवाना झाले होते. मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला आहे. या अपघातात मेटे हे जखमी झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, फॉच्युनर गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. टायर तुटून बाजूला पडले होते.अपघातानंतर विनायक मेटे यांना नवी मुंबईच्या कामोठा येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हा अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला होता ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.विनायक मेटे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढले होते. त्यांनी मोठा लढा मराठा आरक्षणासाठी उभा केला होता. दरम्यान, आता विनायक मेटे यांच्या झालेल्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण मराठा समाजाच्या काळजाला चटका लागला असल्याची भावना व्यक्त केली जाते आहे.