ब्रेकिंग
Trending

अहमदनगर जिल्हा पोलिस घटकातील ई टपाल आणि 2 प्लस इंडिया पोलिस समिट अॅड अॅवॉड्स् 2022 पुरस्कार प्राप्त

संतोष औताडे (मुख्य संपादक) दिनांक-15/07/2022


अहमदनगर जिल्हा पोलिस घटकातील ई टपाल आणि 2 प्लस इंडिया पोलिस समिट अॅड अॅवॉड्स् 2022 पुरस्कार प्राप्त.


सविस्तर माहिती- अहमदनगर जिल्हा पोलीस घटकातील ई – टपाल आणी २ प्लस या उपक्रमांना श्री अधीकारी ब्रदर्स इंटरप्रायजेस चा गव्हर्नन्स नाऊ २d ” इंडीया पोलीस समिट अॅण्ड अवाडर्स २०२२ ” पुरस्कार प्राप्त स्मार्ट पोलीसींग या संकल्पनेतून पोलीस दलातील नावीण्यपुर्ण तंत्रज्ञानाला वाव मिळण्यासाठी श्री अधीकारी ब्रदर्स इंटरप्रायजेस या संस्थेकडून गव्हर्नन्स नाऊ इंडीया पोलीस समिट ॲण्ड अवार्ड आयोजीत करण्यात येतो . सदर अवार्ड करीता देशातील सर्व पोलीस घटकांकडून १ ) बाड़र्र मॉनेजमेंट २ ) चाईल्ड सेफटी ३ ) कमांड अँड कंट्रोल सेंटर ४ ) कम्युनिटी पोलीसींग ५ ) क्राइम इनव्हेस्टीगेशन अॅड प्रासेक्युशन ६ ) सायबर क्राईम ७ ) इंटेलीजन्स कलेक्शन ८ ) पोलीस मॉर्डनायझेशन ९ ) पब्लीक प्रोक्युरमेंट इन इंटरनेट सिक्युरीटी १० ) रोड सेफटी अॅण्ड ट्राफीक मॅनेजमेंट १ ९ ) स्मार्ट पोलीस स्टेशन १२ ) सव्हिलंस ॲण्ड मॉनिटरींग १३ ) टेक्नॉलॉजी १४ ) ट्रेनिंग अॅण्ड कॉसीटी बील्डींग १५ ) वुमन सेफ्टी १६ ) डिजास्टर्स मॅनेजमेंट या श्रेण्याअतंर्गत त्यांच्याकडील नावीण्यपुर्ण तत्रज्ञाना बाबत प्रस्ताव मागवून त्यातून निवड केलेल्या प्रस्तावांना अवार्ड देण्यात येतो . आज दिनांक १५/०७/२०२२ रोजी श्री अधीकारी ब्रदर्स इंटरप्रायजेस या संस्थेकडून वरील श्रेण्यांकरीता देशातील एकुण ४३ पोलीस घटकांना त्यांच्या नावीण्यपुर्ण यांजनेकरीता गव्हर्नन्स नाऊ २ इंडीया पोलीस समिट अॅण्ड अवार्ड २०२२ देण्यात आला त्यात आंध्र प्रदेश , छत्तीसगड , राजस्थान , गुजरात , जम्मु , तेलंगाना , दिल्ली , हिमाचल प्रदेश , ओडीसा आणी महाराष्ट्र राज्यातील पोलीस घटकांना समावेश आहे . महाराष्ट्रातील अहमदनगर , सोलापुर आणी नागपुर यांना वरील अवॉर्ड देण्यात आलेला आहे . अहमदनगर जिल्हा पोलीस घटकातील ई – टपाल आणी २ प्लस या नावीण्यपुर्ण योजनांना अनुक्रमे टेक्नॉलॉजी आणी सव्हिलंस अॅण्ड मॉनिटरींग या श्रेणी करीता श्री अधीकारी ब्रदर्स इंटरप्रायजेस या संस्थेकडील गव्हर्नन्स नाऊ २ इंडीया पोलीस समिट अॅण्ड अवार्ड २०२२ पुरस्कार देण्यात आला . मा . श्री . मनोज पाटील सो , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . श्री . सौरभ कुमार अग्रवाल सो . अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये २ प्लस प्रणाली यशस्वीपणे राबविणे करीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री .अनील कटके यांचे नेतृत्वाखाली सपोनि कैलास वाघ , पोहेकॉ आंबादास शिंदे , पोको मच्छीद्र बड़े , पोका विजय धनेधर यांनी विशेष परीश्रम घेतले आहेत . तसेच ई टपाल प्रणाली यशस्वीपणे राबविणे करीता सायबर पोलीस स्टेशनचे पोसई प्रतिक कोळी , यांचे नेतृत्वाखाली पोकॉ अमोल गायकवाड , पोको सम्राट गायकवाड यांनी विशेष परीश्रम घेतले आहेत.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे