विवेक फणसळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती. संजय पांडे उद्या होणार निवृत्त.
![](https://ahmednagarpolicetimes.com/wp-content/uploads/2022/06/IMG_20220629_235657.jpg)
संतोष औताडे ( मुख्य संपादक) दिनांक-30/06/2022
विवेक फणसळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती. संजय पांडे उद्या होणार निवृत्त.
सविस्तर माहिती- मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे उद्या निवृत्त होणार आहे. आता त्यांच्या जागी विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई पोलिस आयुक्तपद हे राज्यातील सर्वांत मानाचे पद मानले जाते.मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे शेवटच्या दिवशी महत्त्वाची भूमिका बजावतील आणि निरोप घेतील. मग पुढे मुंबई पोलीस आयुक्तपदी कोण येणार ? आयुक्तपदाचा चार्ज कोणाला मिळणार? याची उत्सुकता आहे. नवीन सरकारबरोबरच नवीन मुंबई पोलीस आयुक्त मिळणार का ? हे येत्या दिवसात स्पष्ट होणार आहे. मुंबई पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विवेक फणसळकर, पुण्याचे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांची नावे चर्चेत होती. अखेर फणसळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.विवेक फणसळकर हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकात अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली आहे. आणि त्यापाठोपाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदीही ते होते. कडक शिस्त आणि प्रामाणिकपणा या त्यांच्या गुणांमुळे ते खात्यात ओळखले जातात.