सावकाराच्या जाचास कंटाळुन एकाच कुंटुबातील ९ जणांनी केली विष प्राशन करुन आत्महत्या.

संतोष औताडे (मुख्य संपादक). दिनांक- 21/ 06/2022
सावकाराच्या जाचास कंटाळुन एकाच कुंटुबातील ९ जणांनी केली विष प्राशन करुन आत्महत्या.
सविस्तर माहिती-मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील एकाच वेळी नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती .खासगी सावकारी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे . कमी भांडवलात भरमसाठ रक्कम मिळत असल्याने गावागावांत लालसेपोटी गल्लीबोळात सावकार तयार झाले आहेत . दरमहा 20 ते 30 टक्क्यांपर्यंत व्याजाची वसुली करून कर्जदारांना कंगाल केले जात आहे . सावकारांच्या वसुलीचा तगाद्यामुळे कित्येकांनी आपली आयुष्य यात्रा संपवली आहे . कित्येकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला . अनेक संसार रस्त्यावर आले आहेत.अशीच घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. यामध्ये १ ) डॉ . माणिक यल्लापा वनमोरे वय ४९ वर्षे २ ) सौ रेखा माणिक वनमोरे वय ४७ वर्षे ३ ) श्रीमती आकाताई यलाप्पा वनमोरे वय ६५ वर्षे ४ ) आदीनाथ वनमोरे ५ ) प्रतिमा माणिक वनमोरे वय १८ वर्षे ६ ) शुभम पोपट वनमोरे वय २८ वर्षे ७ ) पोपट यलाप्पा वनमोरे वय ५६ वर्षे ८ ) सौ . संगिता पोपट वनमोरे वय ५० वर्षे ९ ) कु . अर्चना पोपट वनमोरे वय ३० वर्षे सर्व रा . म्हैसाळ ता मिरज जिल्हा सांगलीत या नऊ जणांनी आत्महत्या केली होती .या प्रकरणी २५ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ संशयितांना अटक करण्यात आली आहे . उर्वरित संशयितांच्या अटकेसाठी पथके रावना करण्यात आली आहेत . आत्महत्येपूर्वी मृतांकांनी चिट्ठी लिहून ठेवल्याने या प्रकरणाचा उकल झाली आहे . अशी माहिती पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली . दीक्षित गेडाम म्हणाले , मृतांचे नातेवाईक बाळु रामु वनमोरे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबतसावकारा विरोधात फिर्याद दिली आहे . गुरनं ३०० / २०२२ भादवि क. पोलिस ठाण्यात 306,341,504,506,/34, महाराष्ट्र सावकारी अधिक 39,45 सह अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.