गुन्हेगारी
Trending

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद नेवासा पोलिसांची कारवाई

संतोष औताडे ( मुख्य संपादक )       दिनांक- 21/05/2022


 गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद नेवासा पोलिसांची कारवाई.


सविस्तर माहिती- दिनांक 20/05/2022 रोजी रात्री अंदाजे 10.00 वाजताचे सुमारास रानवारा हॉटेल समोर नेवासा खुर्द येथे एका पांढऱ्या रंगाचे स्कॉर्पिओ गाडीने MH 16 3035 मधुन पंजाबापु चोपडे , विलास आयनर , गुड्डु शेटे व ईतर 03 तीन अनोळखी इसम हे तुकाराम बाप्पुसाहेब बाचकर याच्यासोबत फोनवरून झालेल्या भांडणाचा काटा काढण्यासाठी आले . त्यावेळी आलेले ईसमापैकी मंजाबापु चोपडे याचे व तुकाराम बाचकर हे दोघे फोनवरुन झालेल्या भांडणांच्या कारणावरून बाचाबाची घालून भांडणे करु लागले . त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकुण तेथे लोक जमा होवू लागली त्याच वेळी मंजाबापु सोबत आलेला ईसम विलास आयनर हा गाडीतून खाली उतरुन त्याने त्याच्या उजव्या हातामध्ये एक पांढऱ्या रंगाचा कट्टा घेऊन तुकाराम बाचकर यांच्या समोर जावून त्याच्या दिशने त्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने रोखून धरला व त्याला धमकी दिली की , तुला लई महागात पडेल , त्यानंतर त्यांचे भांडणे अधिकच वाढल्याने त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकुण तेथे लोकांची अधिकच गर्दी जमा झाली त्यानंतर जमलेले लोकांनी स्कॉपिओ मधून आलेल्या इसमांना मारहान करण्यास सुरूवात केली . तेवढ्यांत तेथे पोलीस गाडी आल्याने व त्यांनी पोलीसांना आलेले पाहिल्यानंतर तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करून लागले त्यादरम्यान विलास आयनर याने त्याच्या हातातील कट्टा त्यांच्या आलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या खाली फेकून दिला व पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला व त्याच्या सोबत असलेला इसम मंजाबापु चोपडे या दोघांना • लोकांनी ताब्यात घेऊन पोलीसांच्या ताब्यात दिले . गुडु शेटे व ईतर 03 अनोळखी इसम लोकांच्या गर्दीचा फायदा घेऊन आलेल्या स्कॉर्पिओ गाडीसह पळून गेले . त्यानंतर विलास आयनर याने स्कॉर्पिओ गाडीच्या खाली फेकलेला कट्टा हा तेथील एका इसमाला मिळून आल्याने तो पोलीसांच्या ताब्यांत दिला . त्यानंतर ताब्यांत घेतलेल्या व पळून गेलेल्या इसमांविरुध्द तुकाराम बापुसाहेब बाचकर रा नेवासा बुद्रुक ता नेवासा जि . अहमदनगर याने त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन फिर्याद दिल्याने त्यावरुन पोलीस ठाणे नेवासा येथे गुरनं 415/2022 भारतीय दंड संहिता 1860 कलम 307 , 143 , 147 , 148 , 149 , 504 , 506 सह कलम 3/25 भा.ह. का सह कलम 37 ( 1 ) / 135 मुंबई पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यामध्ये 01 ) मंजाबापु धोंडीराम चोपडे , रा . तामसवाड़ी ता . नेवासा जि . अहमदनगर , 02 ) विलास बबन आयनर , रा . अंमळनेर ता . नेवासा जि . अहमदनगर यांना गुन्ह्यांत अटक केलेली असुन त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांचे दोन वापरते मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत . सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक श्री . मनोज पाटील सो अहमदनगर , मा . अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर श्रीरामपुर , मा . उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे उपविभाग शेवगांव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री . विजय मा . करे पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर थोरात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री समाधान भाटेवाल , पोलीस उप निरीक्षक , श्री . विजय भोंबे , प्र . पोलीस उप निरीक्षक , पोना / गणेश गडाख , पोना / बबन तमनर , पोकों / दिलीप दत्तु राठोड , पोका / बाळासाहेब भवार , पोकों / बाळासाहेब खेडकर , पोकों / संदीप म्हस्के , पोकों / केवलसिंह राजपुत , पोकों / सुमित करंजकर यांनी केली असून पुढील तपास श्री समाधान भाटेवाल , पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे नेवासा हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे