
संतोष औताडे (मुख्य संपादक- नेवासा) दिनांक- 31/08/2022
माऊंट अबू येथे 29 आॅगस्ट ते 2 सप्टेबर नॅशनल मिडिया कॉन्फरन्स 2022 चे आयोजन.
सविस्तर माहिती- समाधान पुरक पञकारीता कडुन समृध्द भारताकडे हे ब्रीदवाक्य घेऊन दिनांक 29 आॅगस्ट 2022 ते 2 सप्टेबर 2022 या कालावधीत राजस्थान येथील ब्रह्माकुमारीज मुख्यालय माऊंट आबू येथे नॅशनल मीडिया संमेलन 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन सिरोहीचे प्रभारी मंत्री आणि राजस्थान विधानसभेचे चीफ व्हिप महेंद्र चौधरी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
गुरुग्राम येथील इंटरनॅशनल मोटिव्हेशनल स्पीकर बीके शिवानी ,
आयआयएमसी, दिल्लीचे संचालक प्रा. संजय द्विवेदी यांनी शांतिवन येथे उपस्थित होते.
देशभरातील 2000 पेक्षा अधिक प्रिंट-इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि रेडिओ पत्रकार, संपादक, अँकर,ऐडीटर, फोटोग्राफर,या कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाले होते.
चार दिवस चालणाऱ्या या मिडिया कॉन्फरन्स मध्ये महाराष्ट्र, राजस्थान,हरीयाणा, पंजाब,उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, झारखंड, पश्र्चिम बंगाल, कर्नाटक, नेपाळ,आसाम, तेलंगणा,ओडीसा, जम्मु काश्मीर तसेच देशभरातून आलेले सर्व पञकार, मिडिया कर्मचारी, लेखक, विविध शेञात काम करत असलेले लोक अनेक विषयावर विचारमंथन करतील या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.पञकारांना समाजात सकारात्मक बनवने , धार्मिक एकता अखंडित ठेवणे हा खरा उद्देश या पाठीमागे मानला जातो.
नॅशनल मीडिया विंगची स्थापना 1985 मध्ये झाल्यापासून जून आणि सप्टेंबर महिन्यात वर्षातून दोनदा राष्ट्रीय मीडिया परिषद आयोजित केली जाते. मात्र यावेळी कोरोनामुळे तीन वर्षांनंतर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या संमेलनात देशभरातील ज्येष्ठ पत्रकार, संपादक, फोटोग्राफर, विचारवंत आणि साहित्यिक उपस्थित होते प्रसारमाध्यमांनी समाजातील समस्यां बरोबरच त्यावर उपायांवरही भर दिला पाहिजे, हा परिषदेचा उद्देश आहे. समाजात जास्तीत जास्त सकारात्मक बातम्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जेणेकरून समाजात सकारात्मकतेचे वातावरण राहील यासाठी हा एक प्रयत्न केला आहे. माऊंट अबू (शांतीवन)हे 90 एकर परिसरात पसरलेले असुन या ठिकाणी 1500 लोक निस्वार्थ सेवा करतात. या ठिकाणी होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे ट्रान्सलेशन 25 भाषेत एकाच वेळी केले जाते.
निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू अप्रतिम निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू कडे जगातील नैसर्गीक आणि आध्यात्मिक उर्जेचे शक्तिपीठ म्हणून पाहिले जाते. सुंदर तलाव, धबधबे, बगीचे, डोंगर द-या, नेत्रदिपक सुर्यास्त आदि नैसर्गीक पर्यटन स्थळाबरोबर स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय देलवाडा, अचलगढ,गुरुशिखर, आबू अंबाजी, पीसपार्क, ज्ञानसरोवर, पांडवभवन,शांतीवन, ग्लोबल हॉस्पिटल आदि विविध विशाल आध्यात्मिक शक्तिस्थाने सुद्धा आहेत. या कॉन्फरन्स मध्ये पाच दिवस विविध कार्यक्रम व्याख्यान ,संगीत आयोजित करण्यात आले होते. समाधान पुरक पञकारीता कडून समुध्द भारताकडे हे ब्रीद वाक्य घेऊन या नॅशनल मिडिया कॉन्फरन्स 2022 माऊंट अबू येथे संपन्न झाला.