गुन्हेगारी
Trending

अहमदनगर जिल्ह्यातील महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने चोरी करणारे दोन आरोपी 2,75,000/- (दोन लाख पच्च्याहत्तर हजार) रु.किं चे दागिन्यासह जेरबंद अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*.

संतोष औताडे (मुख्य संपादक- नेवासा ) क्रमांक पीआरओ /प्रेसनोट /151/2022.             दिनांक :- 06/11/2022

मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील ना उघड चैन स्नॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगांराची माहिती काढुन कारवाई करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्याने सफौ/ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/विजयकुमार वेठेकर, बबन मखरे, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/आकाश काळे, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ/उमाकांत गावडे व चापोना/भरत बुधवंत अशांनी मिळुन आरोपींची माहिती व शोध घेत असतांना पोनि/अनिल कटके, स्थागुशा, यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे कंबर मिर्झा, श्रीरामपूर याने त्याचे साथीदारांसह चैन स्नॅचिंग करुन चोरलेले सोन्याचे दागिने श्रीरामपूर येथे श्रीरामपूर पुणतांबा जाणारे रोडवरील हॉटेल मिरावली येथे विक्री करणेसाठी येणार आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी सदर इसमाची खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. नमुद सुचनाप्रमाणे स्थागुशा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी श्रीरामपूर येथे जाऊन हॉटेल मिरावली, श्रीरामपूर परिसरात सापळा लावुन थांबले. थोडाच वेळात नमुद ठिकाणी मिळालेल्या माहितीतील वर्णना प्रमाणे एक इसम संशयीत हालचाली करतांना पथकास दिसुन आल्याने पथकाने त्यास ताब्यात घेवुन पोलीस असल्याची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव कंबर रहिम मिर्झा, वय 35, रा. वॉर्ड नं. 1, श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एका काळे रंगाचे कापडी पिशवीत सोन्याचे दागिने मिळुन आले. त्याबाबत त्यास विचारपुस करता सुरुवातीस त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार नामे आयुब इराणी, रा. श्रीरामपूर याचे सोबत अहमदनगर, राहुरी, लोणी, व संगमनेर येथून तेेथील महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने ओढुन चोरुन आणले असुन सदर दागिने मोडीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.
आरोपीने दिलेल्या कबुली अनुषंगाने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख तपासले असता खालील प्रमाणे एकुण 04 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं.
1. तोफखाना 907/2022 भादविक 392
2. राहुरी 969/2022 भादविक 392, 34
3. संगमनेर शहर 851/2022 भादविक 392
4. लोणी 497/2022 भादविक 392, 34
वरील गुन्ह्यात चोरी गेलेले एकुण 55 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 2,75,000/- रु.किं.चे दागिने आरोपी नामे कंबर रहिम मिर्झा, वय 35, रा. वॉर्ड नं. 1, श्रीरामपूर याचे ताब्यात मिळुन आल्याने त्यास लोणी पोस्टे गुरनं 497/22 भादविक 392, 34 या गुन्ह्यात पुढील कार्यवाहीसाठी रिपोर्टाने लोणी पोस्टे येथे हजर केले आहे.
तसेच त्याचा साथीदाराचा त्याचे राहते घरी जावुन शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव भु-या ऊर्फ आयुब फैयाज इराणी, वय 50, रा. इराणी गल्ली, वॉर्ड नं.1, श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्यांबाबत विचारपुस करता त्याने आरोपी नामे कंबर मिर्झा यांचे सोबत गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यास लोणी पो.स्टे. येथे हजर केले आहे. पुढील तपास लोणी पो.स्टे. करीत आहे.

आरोपी नामे कंबर रहिम मिर्झा यांचे विरुध्द विविध पोलीस स्टेशनला दरोडा तयारी, जबरी चोरी, चोरी व फसवणुक असे गंभीर स्वरुपाचे एकुण -35 गुन्हे दाखल आहेत. ते खालील प्रमाणे

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं.
1. थिसुर, राज्य केरळ 2495/2013 भादविक 379, 170,34
2. थिसुर शहर, राज्य केरळ 2466/2013 भादविक 379, 170,34
3. वानवाडी, जिल्हा पुणे 216/2016 भादविक 392, 34
4. कोरेगाव पार्क, जिल्हा पुणे 110/2016 भादविक 392, 34
5. इंदीरानगर, जिल्हा नाशिक 184/2016 भादविक 420, 170, 34
6. देवळाली, जिल्हा नाशिक 67/2016 भादविक 420, 170, 34
7. मार्केटयार्ड, जिल्हा पुणे 181/2016 भादविक 392, 34
8. इंदीरानगर, जिल्हा नाशिक 153/2016 भादविक 420, 170, 34
9. इंदीरानगर, जिल्हा नाशिक 147/2015 भादविक 392, 4
10. उपनगर, जिल्हा नाशिक 312/2015 भादविक 420, 170, 34
11. विजापुर नाका, जिल्हा सोलापुर 236/2017 भादविक 394
12. विजापुर नाका, जिल्हा सोलापुर 395/2017 भादविक 392, 34
13. विजापुर नाका, जिल्हा सोलापुर 124/2017 भादविक 394, 34
14. भद्रकाली, जिल्हा नाशिक 794/2017 भादविक 420, 34
15. विजापुर नाका, जिल्हा सोलापुर 339/2017 भादविक 392, 34
16. वापी,जी.आय.डी.सी. 83/2018 भादविक 420, 406, 114
17. पश्चिम देवपुर, जिल्हा धुळे 21/2018 भादविक 392, 34
18. देवपुर, जिल्हा धुळे 64/2018 भादविक 392, 34
19. पश्चिम देवपुर, जिल्हा धुळे 03/2018 भादविक 392, 34
20. इंदीरानगर, जिल्हा नाशिक 57/2018 भादविक 392, 34
21. हडपसर, जिल्हा पुणे 678/2018 भादविक 392, 34
22. गंगापुर, जिल्हा नाशिक 42/2018 भादविक 394, 34
23. नवसारी, जिल्हा गुजरात 107/2018 भादविक 420, 419, 114
24. इंदीरानगर, जिल्हा नाशिक 64/2018 भादविक 392, 34
25. सिंहगड रोड, जिल्हा पुणे 159/2019 भादविक 392, 411, 414
26. APMC यार्ड राज्य कर्नाटक 49/2019 भादविक 420
27. APMC यार्ड राज्य कर्नाटक 53/2019 भादविक 420
28. इंदीरानगर, जिल्हा नाशिक 197/2020 भादविक 420, 170, 34
29. कुंदापुरा, राज्य कर्नाटक 09/2020 भादविक 392
30. बन्तवाल, राज्य कर्नाटक 07/2020 भादविक 149, 420, 34
31. तोफखाना, जिल्हा अहमदनगर 326/2020 भादविक 399, 402
32. तोफखाना 907/2022 भादविक 392
33. राहुरी, जिल्हा अहमदनगर 969/2022 भादविक 392, 34
34. संगमनेर शहर, जिल्हा अहमदनगर 851/2022 भादविक 392
35. लोणी, जिल्हा अहमदनगर 497/2022 भादविक 392, 34

आरोपी नामे भु-या ऊर्फ आयुब फैयाज इराणी यांचे विरुध्द विविध पोलीस स्टेशनला जबरी चोरी, चोरी व फसवणुक असे गंभीर स्वरुपाचे एकुण -17 गुन्हे दाखल आहेत. ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं.
1. नगर तालुका 169/2019 भादविक 304, 392, 337,
2. पारनेर 454/2019 भादविक 420, 170, 34
3. वावी, जिल्हा नाशिक 54/2021 भादविक 419, 420
4. लासलगांव, जिल्हा नाशिक 628/2021 भादविक 420, 34
5. धुळे तालुका, जिल्हा धुळे 78/2021 भादविक 420, 419, 170, 34
6. देवपुर, जिल्हा धुळे 97/2021 भादविक 420, 419, 170, 34
7. चाळीसगांव, जिल्हा जळगांव 270/2021 भादविक 420, 34
8. कोंढवा, जिल्हा पुणे 122/2011 भादविक 420, 170, 34
9. कोथरुड, जिल्हा पुणे 309/2004 भादविक 379
10. चिंचवड, जिल्हा पुणे 157/20211 भादविक 420, 171, 34
11. उत्तर देवपुर, जिल्हा धुळे 61/2019 भादविक 392, 34
12. रामातंर नगर 164/2021 भादविक 420, 171
13. श्रीरामपूर शहर 101/2019 आर्म ऍ़क्ट 4/25
14. तोफखाना 907/2022 भादविक 392
15. राहुरी, जिल्हा अहमदनगर 969/2022 भादविक 392, 34
16. संगमनेर शहर, जिल्हा अहमदनगर 851/2022 भादविक 392
17. लोणी, जिल्हा अहमदनगर 497/2022 भादविक 392, 34

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. संजय सातव साहेब, उविपोअ, शिर्डी विभाग, श्री. राहुल मदने साहेब, उविपोअ संगमनेर विभाग व श्री. संदीप मिटके, उविपोअ, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे