संतोष औताडे-मुख्य संपादक ,नेवासा दिनांक-17/12/2024
अर्चना काळे (महिला पोलिस हवालदार ) यांना नाशिक येथील मास्टर गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक .सविस्तर माहिती- अहिल्यानगर. पोलिस दलात कार्यरत असलेल्या अर्चना काळे महिला पोलिस हवालदार यांनी नाशिक येथील मास्टर गेम्स स्पर्धेत धान्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
नुकत्याच झालेल्या नाशिक येथे दिनांक 14/12/2024 ते 15/12/2024 या कालावधीत झालेल्या मास्टर गेम्स स्पर्धेत अर्चना काळे यांनी 100 मिटर,200 मिटर, 400 मिटर धान्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून अहिल्या नगर पोलीस दलाची मान उंचावली आहे. या मास्टर गेम्स स्पर्धेत सुमारे 500 हुन अधिक खेळाडुंनी सहभाग घेतला होता. अर्चना काळे यांनी या आगोदर देखील अनेक पदके मिळविली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मा जिल्हा पोलिस अधीक्षक मा राकेश ओला साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत. या पुढेही अशीच उत्तम कामगिरी करून पदकं मिळवून देणार असल्याचे पोलिस हवालदार अर्चना काळे यांनी सांगितले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.