ब्रेकिंग
Trending

रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात जात असलेला ट्रक पुरवठा विभागाने पकडला.

संतोष औताडे (मुख्य संपादक नेवासा) दिनांक-13/11/2022


रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात जात असलेला ट्रक पुरवठा विभागाने पकडला. ·सविस्तर माहिती- अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील मिरी ते पांढरीपूल रस्त्यावरील खोसपुरी शिवारात रेशनचा तांदुळ काळ्याबाजाराने विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक ( एमएच २३ एयु ७ ९ २१ ) पकडण्यात आला .ही कारवाई जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने रविवारी केली आहे . अहमदनगर जिल्ह्यात रेशनचा मोठ्याप्रमाणात काळाबाजार सुरू आहे , खा सुजय विखे पा.यांनी ही अहमदनगर जिल्ह्यातील रेशनचा काळाबाजार होत असल्याची माहिती महसूलमंत्र्याच्या लक्षात आणून दिली होती. रविवारी ( दि . १३ ) ५.३० वाजण्याच्या सुमारास मिरी ( ता . पाथर्डी ) कडुन पांढरीपुलाकडे येणा – या दिशेने एक ट्रक आला . ट्रकचा लाईटचे उजेडा मध्ये क्रमांक पाहीला ( एमएच . २३ ए.यु. ७ ९ २१ ) असा असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार ट्रक असल्याने पुरवठा विभागाच्या पथकाने ट्रकला हात दाखवून थांबवण्यास सांगितले . परंतु ट्रक चालकाने ट्रक रोडकडेला थांबविला . यानंतर सर्व अधिका यांनी ट्रक चालकास पथकातील अधिकारी यांनी ओळख सांगून ट्रकमध्ये असलेल्या मालाची पाहणी करण्याचा उद्देश सांगितला . त्यास त्याचे नांव पत्ता विचारला त्यावर त्याने त्याचे नांव गोकुळ महादेव जाधव ( वय 22 , चालक , रा . आर्वी , ता . शिरुर कासार , जि . बीड असे असल्याचे सांगितले . या ट्रक मध्ये अंदाजे तांदुळ किंमत व वजन अंदाजे , असा एकूण ३१ लाख ५० हजार मुद्देमाल ताब्यात घेतला असुन . चालकचा पंचांचे व जिल्हा पुरवठा अधिकार कार्यालय पथकातील अधीका – यांचे समक्ष जबाब व तांदळाचा पंचनामा केला . रेशनचा तांदुळ दुसऱ्यां गोण्यांमध्ये भरुन त्याची बेकायदेशीररित्या वाहतुक करतांना संबंधित आरोपींविरुद्ध अत्यावश्यक वस्तु अधिनियम १ ९ ५५ चे कलम ३ व ७४ कायद्याप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय पुरवठा निरीक्षक शिवराज पवार यांच्या फिर्यादीवरुन अहमदनगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे