अहमदनगर शहरातील मोटर सायकल चोरणारा आरोपी जेरबंद तोफखाना पोलीसांनी केल्या तब्बल 23 मोटर सायकली हस्तगत

संतोष औताडे ( मुख्य संपादक ) दिनांक -04/05/2022
अहमदनगर शहरातील मोटर सायकल चोरणारा आरोपी जेरबंद तोफखाना पोलीसांनी केल्या तब्बल 23 मोटर सायकली हस्तगत.
सविस्तर माहिती-अहमदनगर शहरातील मोटर सायकल चोरणारा आरोपी जेरबंद तोफखाना पोलीसांनी केल्या तब्बल 23 मोटर सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. तोफखाना तपास पथकाची दमदार कारवाई तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 340/2022 भा.दं.वि.क 379 प्रमाणे दिनांक 28/04/2022 रोजी दाखल असुन यातील फिर्यादीची बुलेट मोटर सायकल एम एच 16 वी क्यु 9009 हि दिनांक 28/04/2022 रोजी दुपारी 02/50 वा ते दुपारी 03/30 वा चे दरम्यान फिर्यादीचे ऑफिसचे बाहेरुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने वरील मोटर सायकल चोरुन नेल्याबाबत पो स्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की , आरोपीनामे किसन उर्फ कृष्णा पोपट सापते वय 26 वर्षे रा खकाळवाडी ता आष्टी जि बीड याचे बाबत संशय असल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने विविध ठिकाणाहून विविध कंपनीच्या मोटर सायकल चोरल्याचे कबुल केले. खालीलप्रमाणे मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. वरील मोटर सायकली गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात येवून सदर आरोपी यास गजाआड केले आहे . सदर कारवाई ही मा . पोलीस अधिक्षक श्री . मनोज पाटील , मा . अपर पोलीस अधिक्षक श्री . सौरभ अग्रवाल , मा . उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहमदनगर श्री अनिल कातकाडे साो . यांचे सुचना व मार्गदर्शखाली पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तोफखाना तपास पथकामधील पोउपनिरी समाधान सोळंके , पोहेकॉ / दत्तात्रय जपे , पोहेकॉ सुनिल शिरसाठ , पोना अविनाश वाकचौरे , पोना वसिम पठाण , पोना अहमद इनामदार , पोना शैलेश गोमसाळे , पोकों सतिष त्रिभुवन पोकॉ शिरष तरटे पोकों सचिन जगताप , पोकॉ धिरज खंडागळे पोकॉ चेतन मोहिते , पोकॉ गौतम सातपुते , पोकॉ अतुल कोतकर , पोकॉ प्रशांत राठोड यांनी केली आहे .