गावठी कट्टा ( अग्निशस्त्र ) 2 जिवंत काडतुस बाळगणारा इसम स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांचेकडून जेरबंद .

संतोष औताडे ( मुख्य संपादक ) दिनांक : ०८/०६ /२०२२
गावठी कट्टा ( अग्निशस्त्र ) 2 जिवंत काडतुस बाळगणारा इसम स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांचेकडून जेरबंद .
. मा . पोलीस महानिरीक्षक सो . नाशिक परिक्षेत्र , नाशिक यांनी अवैध्दरित्या शस्त्रे बाळगणान्या इसमा विरुध्द कारवाई करण्याबाबत सूचना केल्याने मा . पोलीस अधीक्षक श्री . मनोज पाटील सो . यांनी पो.नि. अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्हयातील अवैध्दरित्या गावठी कट्टे ( अग्नीशस्त्र ) बाळगणान्या इसमांवर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते . अहमदनगर जिल्हयातील अवैध्दरित्या गावठी कट्टे ( अग्नीशस्त्र ) बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेत असतांना दिनांक ०४/०६/२०२२ रोजी श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना गोपनिय माहीती मिळाली की , प्रवरा संगम बस स्टॅन्ड , ता . नेवसा येथे एक मध्यम बांध्याचा मुलगा देशी बनावटीचा कट्टा ( अग्नीशस्त्र ) व काडतुसे विक्री करण्यासाठी देणार आहे . त्यानुसार पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी प्रवारा संगम बस स्टॉप येथे सापळा लावून थांबले असतांना वरील नमुद बातमीतील वर्णनाचा इसम बस स्टॉप परिसरात संशयीतरित्या फिरत असतांना दिसला ,नमुद बातमीतील इसम हाच असल्याची खात्री होताच त्यास घेराव घालून ताब्यात घेवून त्यास पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी आपली ओळख करून देवून त्यास त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव सोन्या उर्फ संतोष पाडुरंग बंगाळ वय २ ९ वर्ष , रा . रोटेगाव ता . वैजापुर जि . औरंगाबाद असे असल्याचे सांगीतले त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे कशामध्ये ३०,००० / – रु . किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व ४०० / – रु.किमतीचे २ जिवंत काडतुसे असा ३०,४०० / – रु . किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे . ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द पोना / १८५ ज्ञानेश्वर शिंदे नेम , स्थानिक गुन्हे शाखा यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन फिर्याद दिली असून त्याबाबत नेवासा पो.स्टे . ला गुरनं . ४५ ९ / २०२२ , भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५ , ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई नेवासा पो.स्टे . हे करीत आहेत . सदरची कारवाई मा . श्री . बी . जी . शेखर पाटील सो .. पोलीस महानिरीक्षक सो . नाशिक परिक्षेत्र , नाशिक यांचे आदेशाने व मा . श्री . मनोज पाटील सो . पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . श्रीमती स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर व श्री . सुदर्शन मुंढे साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , शेवगाव विभाग , अहमदनगर यांचे सूचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .