ब्रेकिंग
Trending

पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील लिखित ‘शूर सरसेनापती संताजी पुस्तकाचे बुधवार दि. १९ ऑक्टोबरला प्रकाशन.

संतोष औताडे ( मुख्य संपादक नेवासा) दिनांक-16/10/2022 

नगर – नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील लिखित ‘शूर सरसेनापती संताजी शंभूराजांच्या क्रूर हत्येचा प्रतिशोध…!’ या पुस्तकाचे बुधवार, दि. १९ ऑक्टोबर २०२२ रोजी नगरमध्ये प्रकाशन होत आहे. सावेडी येथील माऊली सभागृहात दुपारी ४ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत या ऐतिहासिक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष श्रीपाल सबनीस, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, सेवानिवृत्त पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, आय लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया व घोरपडे घराण्याचे वंशज महेशराव घोरपडे आदी मान्यवरांच्या उपस्थिती व शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती डॉ.सौ. विद्युलता शेखर पाटील यांनी दिली.
पोलीस महासंचालक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी पोलिसी अधिकाऱ्याचे कणखर मना बरोबरच हळवे साहित्यिक मनही जपले आहे. याधीही त्यांचे ९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यात शोध, प्रतिशोध, रानजुई, पोलीस अंमलदाराचे अधिकार व कर्तव्य, प्रबोधिनी संकेत, दक्षता लेखन, शोध सत्याचा, मोर्णाकाठचे दवबिंदू, प्रतिबंध आदी साहित्य जनमाणसात प्रसिद्ध झाली असून अनेकांना मार्गदर्शक ठरली आहेत. शूर सरसेनापती संताजी या पुस्तकात त्यांनी संताजींचे शौर्य व स्वराज्य निष्ठेच्या गाथेवर प्रकाश टाकला आहे. शिव कालीन इतिहासाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून त्यांनी समर्थपणे हे लिखाण केले आहे.
पोलीस महासंचालक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी शूर सरसेनापती संताजी शंभूराजांच्या क्रूर हत्येचा प्रतिशोध…! हे ऐतिहासिक पुस्तक अनेकांना अर्पण केले आहे. यात अनेक शतकं अन्याय, अत्याचार व क्रूर छळाने रंजल्या गांजलेल्या रयतेस, पारतंत्र्याचे जोखड तोडून स्वराज्य उभारणीसाठी ज्यांच्या घरादाराची राखरांगोळी झाली अशांना, ज्यांनी हसत-हसत रणांगणात प्राण सोडून ज्यांच्या देहावर अंत्यसंस्कार नाही करता आले अशांना, ज्यांच्या घरचा दिवा मृत्यूनंतरही कधी नाही पेटला अशा ज्ञात-अज्ञात शूर मावळ्यांच्या पवित्र स्मृतीस त्यांनी हे पुस्तक अर्पण केले आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी या ऐतिहासिक पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे