रेशनिंगचा शासकीय तांदुळ काळया बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या ट्रकवर छापा आरोपीकडून 400 गोण्या तांदळासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त.

संतोष औताडे- मुख्य संपादक ,नेवासा,दिनांक :- 26/06/2025
—————————————————अहिल्या नगर जिल्ह्यात
रेशनिंगचा शासकीय तांदुळ काळया बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या ट्रकवर छापा आरोपीकडून 400 गोण्या तांदळासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई
—————————————————
मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार विश्वास बेरड, बिरप्पा करमल, हृदय घोडके, रोहित मिसाळ व भगवान धुळे अशांचे पथक तयार करुन जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणेकामी पथकास रवाना केले.
दिनांक 26/06/2025 रोजी पथक जामखेड पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, जामखेड ते करमाळ जाणाऱ्या रोडने टाटा 2518 ट्रक क्रमांक एमएच-17-बीडी-8102 मधुन रेशनिंगचा तांदुळ काळया बाजारात विक्रीसाठी जाणार आहे.पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष जामखेड ते करमाळा जाणाऱ्या रोडवर आयटीआय, जामखेड येथे सापळा रचुन संशयीत वाहन मिळून आल्याने वाहनास थांबविले.वाहन चालकास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) सुंदर बबन घुमरे, वय 60, रा.लोणी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.चालकाचे ताब्यातील वाहनाची तपासणी केली असता ट्रकमधील गोण्यामध्ये तांदुळ मिळून आला.
पथकाने वाहन चालकास विश्वासात घेऊन मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता वाहन चालक हा ट्रकचा मालक असून ट्रकमधील तांदळाच्या गोण्या या 2) योगेश मोहन भंडारी, रा.जामखेड, ता.जामखेड (फरार) याचे दुकानामधुन घेतल्या तो सदरचा तांदुळ हा रेशनचा शासकीय स्वस्त धान्य वितरण योजनेतील असून तो विक्रीसाठी सांगली येथे घेऊन जात असल्याची माहिती सांगीतली.पंचासमक्ष वाहन चालकाचे ताब्यातील 5,00,000/- रू किं.त्यात 400 गोण्या तांदुळ, 25,00,000/- रू किं.त्या टाटा 2518 कंपनीचा ट्रक क्रमांक एमएच-17-बीडी-8102 असा एकुण 30,00,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन वरील आरोपीविरूध्द जामखेड पोलीस स्टेशन गुरनं 362/2025 जिवनावश्यक वस्तु अधिनियम कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर व मा.श्री. गणेश उगले, उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यभार कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.