चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमे दरम्यान 55 विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई

संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा दिनांक- 16/08/2025
सविस्तर माहिती- चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमे दरम्यान 55 विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई सदर वहानापैकी नऊ वाहन चालकांनी त्यांची कागदपत्रे सादर न केल्याने सदर संशयास्पद 09 वाहने पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहे.राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या ह्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन ने आज दिनांक 16/08/2025 रोजी विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती.
सदर मोहिमेदरम्यान 55 दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली. पैकी 46 वाहनांवर 25700 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्या गाडी मालकाच्या ताब्यात परत नंबर प्लेट बसवून देण्यात आल्या.
उर्वरित 09 गाड्यांची कागदपत्रे अद्याप पर्यंत साधरण केल्याने सदर गाड्यांच्या मालकी हक्काबाबत खात्री करून पुढील कारवाई करत आहोत.
राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या दुचाकी चार चाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही.. तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवलेले असल्यास चोरीचे वाहन शोधणं सोप होईल.
सदर चोरीचे वाहन शोध मोहीम ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री देवदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात पोउपनि. गणेश वाघमारे , पोउपनि. राजू जाधव, पोउपनि. विष्णू आहेर, सफौ. आव्हाड, पोहेकॉ. संतोष ठोंबरे , बापू फुलमाळी,पोना. जालिंदर साखरे पो. कॉ.सतीश कुऱ्हाडे, गणेश लिपने, शेषराव कुटे, इफ्तेखार सय्यद अमोल भांड, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, कोळी होमगार्ड कर्मचारी यांच्या पथकाने केलेली आहे.
नवीन वाहनांवर नंबर प्लेट नसल्याने कारवाई करण्यात आली आहे तसेच सदरील वाहने नंबर प्लेट न लावता शोरूमच्या बाहेर रोडवर आल्याने शोरूम वाल्यांना आरटीओ द्वारे पत्र पाठवून कारवाई करण्यात येईल
तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नये. अल्पवयीन मुले वाहन चालवताना मिळून आल्यास त्यांच्या पालकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल.