
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक -07/06/2023
भेंडा येथील शिक्षक बापुसाहेब औताडे आदर्श वृक्षमिञ पुरस्काराने सन्मानित. सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ञिमुर्ती कॉलेज नेवासा फाटा येथील शिक्षक श्री बापुसाहेब औताडे यांना आदर्श वृक्षमिञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भेंडा.येथील श्री संत नागेबाबा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श वृक्षमिञ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते.या पुरस्कारासाठी बापुसाहेब शंकर औताडे यांची निवड करण्यात आली होती. समाजात सामाजिक कार्य करताना आप ल्या परिसरातील तसेच घराजवळ विविध प्रकारचे झाडे लावून वृक्ष संवर्धन केले होते. परिसर शुशोभिकरण व वृक्ष लागवड हा उपक्रम त्यांनी सातत्याने हाती घेतला होता.यांच्या या सामाजिक कामाची दखल घेत संत नागेबाबा परिवार यांनी त्यांना 2023 या वर्षाचा आदर्श वृक्षमिञ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले
. त्याच बरोबर भेंडा येथील नागेबाबा
शाखेत 10 वी 12 वी च्या
उत्तीर्ण मुलांचा सत्कार
समारंभ तसेचं नागेबाबा
वृक्षमित्र पुरस्कार वितरण
सोहळा पार पडला
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी
जिजामात माध्यमिक चे
माजी प्राचार्य मा पंडित
सर तसेचं नागेबाबा
परिवारातील मा रसाळ
मामा, तागड साहेब,
भाऊसाहेब फुलारी,
सावंत सर, गव्हाने गणपत
बापूसाहेब नजन सर,
औताडे सर भाऊसाहेब
चौधरी शिवाजी चौधरी
नवथर सर, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.