
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक -28/11/2025
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 97 व्या मुलीचा राहुरी पोलीस स्टेशन कडून शोध.
सविस्तर माहिती- कात्रड, ता. राहुरी येथील अल्पवयीन मुलगी हिस दि. 18/2/2025 रोजी अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले बाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 18/2/2025 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 131/2025 बी एन एस कलम 129, 137 (2) प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीचा शोध गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेण्यात आला असून पीडित मुलीचा तिचे पालकांसमक्ष जबाब नोंद करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे साहेब यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ,पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे , पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कांबळे ,इत्तेकार सय्यद हे करत आहे.
राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या अल्पवयीन मुला-मुलींची आपण खुलेपणाने संवाद ठेवून अशा प्रकारे त्यांच्या मनात कुठलाही ताण तणाव किंवा आकर्षण निर्माण होऊन त्यांच्यावर अपहरणाचा प्रसंग येऊ नये यासाठी आपल्या पाल्यांसोबत मित्रत्वाने मोकळेपणाने वागून संवाद ठेवावा .तसेच अल्पवयीन पाल्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या व ते वापरत असलेल्या मोबाईल ॲप वर लक्ष ठेवावे असे आवाहन राहुरी पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक संजय ठेंगें साहेब यांनी सांगितले आहे.



