ब्रेकिंग
Trending

गाड्यांवर दुल्हन हंम ले जायेंगे चे स्टिकर जालन्यात आयकर विभागाचा छापा 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त.

संतोष औताडे (मुख्य संपादक ) दिनांक-11 आॅगस्ट 2022


गाड्यांवर दुल्हन हंम ले जायेंगे चे स्टिकर जालन्यात आयकर विभागाचा छापा 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त.


सविस्तर माहिती- जालन्यात  आयकर विभागाने टाकलेल्या छापेमारीत 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोनं अशी एकूण 390 कोटींची बहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागली आहे.आयकर विभागाच्या 300 अधिकाऱ्यांनी जालन्यातील स्टील उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांच्या मालमत्तेवर 5 दिवसांपूर्वी छापेमारी केली होती.या छापेमारी दरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यानी स्टील उद्योजकांच्या कंपन्यांसह घरावर छापे टाकले होते .या छापेमारीतच काही दस्तावेज,32 किलो सोनं 58 कोटी रुपयांची रोख रक्कम अशी एकूण 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागल्यानं खळबळ उडाली आहे.सूंदरलालजी सावजी बँक,एस आरजे पित्ती स्टील,इलेक्ट्रॉनिकस प्रतिष्ठाने,फायनान्सर विमलराज सिंघवी,डीलर प्रदीप बोरा यांच्या घरासह कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली असे समजते.इनकम टॅक्स विभागाने मारलेल्या छापेमारीत जालन्यातील चार मोठ्या स्टील व्यावसायिकांवर छापा टाकला. या व्यावसायिकांची नावं अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, औरंगाबाद पथकाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर स्टील व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. जालन्यात एक ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांमधून जात एकूण पाच पथकांनी स्टील व्यावसायिकांच्या घरावर आणि ऑफिसवर छापा टाकला होता.

जालना येथे टाकण्यात आलेल्या या छापेमारीबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. 8 ऑगस्टपर्यंत आयकराचे अधिकारी तपास करत होते. नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी एकूण अडीचशेपेक्षा जास्त अधिकारी 120 हून अधिक वाहनांमधून जालन्यात धडक दिली होती. जालन्यात आढळून आलेली रोख रक्कम स्थानिक स्टेट बँकेत नेण्यात आली. तिथे सकाळी 11 वाजता या रोख रकमेची मोजणी सुरु करण्यात आली होती. ही मोजणी तब्बल 14 तासांनी म्हणते मध्यरात्री एक वाजता पूर्ण झाल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे गाड्यावर होते दुल्हन हंम ले जायेंगे चे स्टिकर या पथकांनी छापे टाकताना व्यावसायिक व त्यांच्याशी संबंधित लोकांना मागमूस लागू नये , छाप्याच्या तयारीची बातमी फुटू नये याची पूर्ण सतर्कता बाळगली . नाशिक , पुणे , ठाणे व मुंबईच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांवर काही लग्नाला जात असल्याचे भासवत इनोव्हा कारवर वर-वधू यांच्या नावाचे स्टिकर लावले , तर काहींनी ‘ दुल्हन हम ले जायेंगे ‘ असा मजकूर असलेले वेगवेगळे स्टिकर लावून त्यांना कोडवर्ड दिले होते.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे