ब्रेकिंग
Trending

धनंजय जाधव यांची राहुरी पोलीस स्टेशनचे नविन प्रभारी पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक -22/06/2023

पोलीस ठाणे राहुरी प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हजर झाले आहेत.

पोलीस ठाणे राहुरी प्रभारी अधिकारी म्हणून धनंजय अनंतराव जाधव पोलीस निरीक्षक यांनी काल बुधवारी संध्याकाळी उशिरा पोलीस ठाण्याचा चार्ज घेतला आहे, पदभार स्वीकारला आहे.

मागील २१ दिवसापासून पोलीस ठाण्यास प्रभारी अधिकाऱ्याची प्रतिक्षा होती, पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार श्री. करपे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शनिशिंगणापूर यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या शुक्रवारी १६ तारखेला बदल्या केल्या होत्या. या सर्वसाधारण बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात बदलून आलेले होते, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांची नेमणूक राहुरी येथे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून केली आहे. धनंजय जाधव हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे कार्यरत होते.

त्यांनी यापूर्वी चंद्रपूर, नक्षलग्रस्त भागात गडचिरोली, पुणे शहर, कोल्हापूर व सोलापूर ग्रामीण येथे कर्तव्य बजावले आहे.

पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना मागील ३० वर्षाच्या काळामध्ये उत्कृष्ट आणि कौशल्यपूर्ण कामगिरीसाठी एकूण २०० बक्षिसे आहेत, तसेच राज्य सरकारचे खडतर सेवा पदक व केंद्र सरकारचे अंतर्गत सुरक्षा सेवा पदक देखील प्राप्त करण्यात आलेले आहे.

पोलीस निरीक्षक जाधव यांनी राज्यात घडलेल्या काही महत्त्वाच्या हत्याकांडामध्ये तपास पथकामध्ये महत्वपूर्ण कामगिरी पार पाडलेली आहे.

पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे कार्यतत्पर, कर्तव्य कठोर आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. चार्ज घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि अंमलदार यांच्याशी कामकाजाबाबत सविस्तर स्पष्ट सूचना आणी आदेश दिले आहेत.

शासन आपल्या दारी हा शासनाचा सेवा हमी उपक्रम अंतिम लक्ष्य ठेवून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल या साठी प्रयत्नरत राहणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे