दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता व साहित्य पुरस्कार वितरण सोहळा 2022 उत्साहात संपन्न

(संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा ) दिनांक-18/12/2022
ज्येष्ठ पत्रकार अभिजित कांबळे
राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्काराने सन्मानित*
सविस्तर माहिती- स्वातंत्रयाचा लढा संपला आता समतेची लढाई,विद्रोही व वैचारिक लिखाणाबरोबरच ललित साहित्य दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी लिहिले,सातत्याचे धागे टिकवून पुढ कस जावे अशी शिकवण दिली .समाजाला सन्मार्ग दाखवून समाजविकास साधला जावा,असा समाजवाद मुकुंदराव पाटील यांना अभिप्रेत होता,असे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मितीचे अध्यक्ष डॉ.राजा दिक्षीत असे सांगितले. – नेवासा तालुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे वतीने देण्यात येणारे सन २०२१-२२ या वर्षीचे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारीता व साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी बोलतांना दैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके यांनी सध्या महाराष्ट्रात अनेक संत,महात्मे यांचेवर चिखलफेक चालू आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वेगळ्या दिशेने घेऊन जावून लोकशाहीला आव्हान निर्माण झाले आहे.त्यामुळे महापुरुषांच्या विचारांची खर्या अर्थीने गरज निर्माण झाली आहे.लोकशाहीत आज समाजाचे प्रश्न मांडणार्या ,सत्य पत्रकारिता करणारे यांना मनस्ताप सहन करावा लागत असून नोकरी वर गंडांतर येत आहे ,असे दैनिक लोकमत चे संपादक सुधीर लंके यांनी सांगितले.तसेच समाज हितासाठी पत्रकार,लेखक, साहित्यिक यांनी पणतीची भूमिका निभवावी,दै सकाळचे संपादक प्रकाश पाटील. माहिती तंत्रज्ञान युगात विद्यार्थी, पत्रकार यांनी संगणक प्रशिक्षण घेऊन साक्षर व्हावे,दीनमित्रकार मुकुंद पाटील यांनी सांगितलेला सत्याचा मार्ग स्वीकारून,प्रसंगी समाजहितासाठी कठोर भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे,तरवडी गावाने आजही मुकुंदराव पाटील यांच्या समतेच्या विचाराची ज्योत कायम तेवत ठेवली आहे,मा.आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील
तरवडी (ता. नेवासा ) येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने सत्यशोधक विचारांशी बांधिलकी असणाऱ्या पत्रकारास व साहित्यास दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने १९९५ पासून दरवर्षी पुरस्कार दिले जातात.
स्मारक समितीच्या सन २०२१-२२ च्या पुरस्कारांची घोषणा स्मारक समितीचे अध्यक्ष, माजी आमदार पांडुरंग अभंग व सचिव उत्तमराव पाटील यांनी घोषित केले ते पुढिल प्रमाणे –
दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता व साहित्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न-चरित्र), डॉ. प्रतिभा सुरेश जाधव,नाशिक (अस्वस्थतेची डायरी-वैचारिक लेखन), डॉ. तुकाराम रोंगटे,पुणे (आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर-समिक्षा), राकेश सांळुके,सातारा (दख्खण समृद्ध प्रवास-प्रवासवर्णन), योगेश प्रकाश बिडवाई,मुंबई (कांद्याची रडकथा शिवार ते बाजार-संशोधन), डॉ. शिवलिंग मेनकुदळे,पुणे (प्रबोधनाचा वसा आणि वारसा-व्यक्तिवेध).
यावेळी,मा.आ.पांडुरंग अभंग राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, अँड संभाजी बोरुडे, अँड बन्सी सातपुते, प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे,प्रा.नारायण म्हस्के,अशोक मिसाळ, काकासाहेब शिंदे, बाबासाहेब घुले, डॉ.शिरीष लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुलहाफिज शेख,बाबा आरगडे, डॉ.नरवडे कुकाणा, उत्तमराव पाटील,प्रा.सुनील इंगळे, मुख्याध्यापक सावता गायकवाड, पत्रकार सुकदेव फुलारी, सुनिल गर्जे, सुनिल पंडित,अनिल गर्जे, सोमनाथ कचरे ,प्रा.संतोष सोनवणे,कारभारी गरड, संतोष औताडे,काका नरवणे,आदिसह युवक, ग्रामस्थ उपस्थित होते.