ब्रेकिंग
Trending

खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपी सुपा पोलीसांकडुन जेरबंद.

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा दिनांक-31/05/2023


खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपी सुपा पोलीसांकडुन गजाआड.                 सविस्तर माहिती –
दि.26/05/2023 रोजी सकाळी 07.30 वा चे सुमारास सुपा पो.स्टे हद्दीत पारनेर फाटा ते
पारनेर जाणारे रोडवर अंकुश भिमाजी कोठावळे रा. सांगवी सुर्या ता. पारनेर याचे डोक्यात दगड घालुन
खुन करण्यात आला होता. सदर वरुन सुपा पो.स्टे गु.र.नं 254/2023 भा.द.वि.कलम 302 प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो. यांनी सुचना
दिल्याने पो.नि श्री ज्योती गडकरी व स्थानिक गुन्हे शाखा यांनी समांतर तपास करणेबाबत सुचना
दिल्याने सदर गुन्ह्याचे तपासकामी पथके रवाना करण्यात आली होती.
सदर गुन्हायात कोणताही तांत्रिक पुरवा नसल्याने तपासात अडचणी येत होत्या त्याचवेळी
गुप्त बातमीदारामार्फतीने सदर इसमाचे वर्णन मिळाले. त्या इसमाचे वर्णनावरुन व सी.सी.टी.व्हि फुटेज
च्या मदतीने आसपासचे गावामध्ये शोध घेवून तपास पथकाने इसम नामे भाऊसाहेब विठ्ठल वाघुले
रा.पिंपळनेर ता.पारनेर याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस करता त्याने सदर गुन्हा केल्याची
कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अ.नगर,
मा. श्री प्रशांत खैरे सो, अपर पोलीस अधिक्षक, अ.नगर मा. श्री. अनिल कातकडे सो.
उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण (चार्ज), श्री. दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक
स्थानिक गुन्हे शाखा पो. नि. श्रीमती ज्योती गडकरी, पोलीस निरीक्षक, सुपा पोलीस स्टेशन
यांचे मार्गदर्शनाखाली पो.स.ई धाकराव, स.फौ काळे, पो.हे.कॉ 471 खंडेराव शिंदे, पो.हे. कॉ
मखरे, पो.हे.कॉ रमेश शिंदे, पो.हे.कॉ वेठेकर, पो.ना यश ठोंबरे, पो.ना 338 संदीप पवार,
पो.ना 2246 कल्याण लगड, पो.ना भिमराज खर्से, पो. ना कुसाळकर यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे