अर्चना काळे (पोलिस कॉ) यांचे मास्टर गेम्स् फेडरेशन स्पर्धेत यश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सन्मान.

संतोष औताडे (मुख्य संपादक) दिनांक.26/05/2022
अर्चना काळे (पोलिस कॉ) यांचे मास्टर गेम्स् फेडरेशन स्पर्धेत यश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सन्मान.
सविस्तर माहिती-ञिवेंंंंद्रम केरळ येथे नुुकत्याच झालेल्या मास्टर गेमस् फेडरेशन स्पर्धेत पोलिस कॉ.अर्चाना रामभाऊ काळे यांनी यश मिळवले आहे. ( इंडिया ४ थी नॅशनल मास्टर गेम्स् फेडरेशन स्पर्धा त्रिवेंद्रम केरळ येथे झालेल्या स्पर्धेत – 18 मे ते 22 मे २०२२ पर्यंत या स्पर्धेत १०० मिटर रनींग स्पर्धेत सिलव्हर मेडल दुतीय पारितोषिक पटकावले आहे. २०० मिटर रनिंग स्पर्धेत कांसंपदक (तृतीय क्रमांक) पारितोषिक मिळवले आहे. ४०० मिटर रनिंग स्पर्धेत सिलव्हर पदक दुतीय पारितोषिक प्राप्त केले आहे. पॉवर लिफ्टींग स्पर्धेत ( वजन उचलणे ) स्पर्धेत ४२ वयोगदात ५७ वजन गटात सिलव्हर मेडल (दुतीय पारितोषिक) मिळविले
पो.हे.कॉ १२४६ अर्चना रामभाऊ काळे यांची ‘ नेमणुक अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष , अहमदनगर या ठिकाणी असुन त्यांनी आपल्या कर्तव्या बरोबर खेळ ही जोपासला आहे. यांनी आत्तापर्यंत विविध स्पर्धेत यश संपादन केले आहे.यांच्या या यशाबद्दल मनोज पाटील साहेब अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी अहमदनगर पोलिस दलाचे नाव लौकीक केल्याबद्दल त्यांचा सन्मान केला आहे.अर्चना काळे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.