पोलिस अधीक्षक डॉ . दीपाली काळे यांना शिरोळ भूषण पुरस्कार जाहीर. 1जुन रोजी होणार पुरस्कार वितरण सोहळा.
संतोष औताडे (मुख्य संपादक – नेवासा ) दिनांक -16 May 2022
पोलिस अधीक्षक डॉ . दीपाली काळे यांना शिरोळ भूषण पुरस्कार जाहीर. 1जुन रोजी होणार पुरस्कार वितरण सोहळा.
सविस्तर माहिती-नाशिक जिल्ह्यातील लेडी सिंघम म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पोलिस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांना शिरोळ भूषण पुरस्कार जाहीर झाला असून दि . १ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा करण्यात येणार आहे . येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे. ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांचे प्रवचन होणार आहे , अशी माहिती स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व अनीलराव यादव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली . शिरोळ येथील जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ . अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. आरोग्य राज्यमंत्री डॉ . राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली , तसेच जनसुराज्य पक्षाचे नेते आ . विनय कोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे .या कार्यक्रमास माजी खा.राजु शेट्टी , दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील , माजी आ . उल्हास पाटील , गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे , जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष सुमीत कदम उपस्थित राहणार आहेत . नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कर्तृत्ववान व्यक्तींचा दि.1 जून रोजी शिरोळ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. या अगोदरही अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर च्या अपर पोलिस अधीक्षक असतांना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असतांना त्यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण केली होती म्हणुन डॉ दिपाली काळे यांना लेडी सिंघम म्हणुन ओळखल्या जातात. पोलिस अधिक्षक डॉ दिपाली काळे मॅडम यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.