नेवासा तहसीलदार यांच्या नावाने बनावट सही व शिक्का वापरून लाखोंचा अपहार आरोपी विरोधात गुन्हा दाखल.

संतोष औताडे (मुख्य संपादक). दिनांक- 27/06/2022
नेवासा तहसीलदार यांच्या नावाने बनावट सही व शिक्का वापरून लाखोंचा अपहार आरोपी विरोधात गुन्हा दाखल.
सविस्तर माहिती-नेवासा तालुक्यातील तहसीलदार रुपेशकुमार विजयलाल सुराणा वय 41 वर्ष यांनी नेवासा पोलीस स्टेशनला हजर राहुन फिर्याद लिहून दिली की , वर नमुद तहसिल कार्यालय ता . नेवासा येथे दिनांक 22/02/2019 पासुन तहसिलदार म्हणून काम पाहत आहे . नेवासा तहसिल मार्फत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतपिकाचे नुकसान झालेल्या शेतकरी यांना महाराष्ट्र शासनाकडुन लाभार्थी यांना आर्थिक मदत धनादेशादवारे मा . जिल्हाधिकारी , अहमदनगर यांचे कडील आदेश क्र . आव्यमपु / कार्या 1933 / 1625/2019 दिनांक 20/11/2019 व अनुषांगिक आदेशान्वये वितरीत करण्यात येत असतात.देडगाव गावाचे धनादेश बँकेत जमा करणेकामी ताब्यात घेतले होते . तसेच काही धनादेश कोतवाल नामे अविनाश हिवाळे याने जेऊर हैबती येथील कोतवाल राजु इनामदार यास घेऊन येणेबाबत कळविले व त्यानुसार काही धनादेश है राजु इनामदार करवी प्राप्त करून घेतले तर काही धनादेश हे स्वतः तहसिल कार्यालयात येऊन प्राप्त करण्यात आले . त्यावरुन सदर रजिष्टर अ.क्र . 128 एच.डी.एफ.सी पुणे या बँकेचे नावे धनादेश क्र . 070913 दिनांक 11/03/2020 रक्कम रुपये 800 / – अशा प्रकार देणेत आलेले धनादेश संबंधित नुकसान ग्रस्त शेतक – यांना वाटप न करता सदर धनादेशामध्ये परस्पर तहसिलदार नेवासा यांचा बनावट शिक्का वापरून व बनावट सही करुन तसेच बँकेचे नाव बदलुन व रक्कमे मध्ये खाडाखोड करून त्यातील अ.क्र . 128 चे धनादेश हा एच.डी.एफ.सी पुणे बँकेच्या नावे देणेत आला होता .देडगावचे कोतवाल नामे अविनाश हिवाळे त्यांनी स्वतःचे पदाचा गैरवापर करून स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता नुकसान ग्रस्त लाभार्थी शेतक – यांना वितरीत धनादेशाचे वाटप न करता बँकेच्या नावात खाडाखोड करुन , रक्कमेमध्ये वाढ करुन तसेच तहसिलदार चे 6/8 शिक्याचा वापर करुन व बनावट खोटी सही करून एकुण 1614784 / – इतक्या अपहार करून शासनाचे नुकसान केले म्हणुण यांचे विरोधात कायदेशिर फिर्याद दिली असून कलम ,408,409,400,465,467,468,471,473,477(अ),484 भादवि कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून नेवासा पोलीस स्टेशनचे विजय करे पुढील तपास करीत आहेत.