ब्रेकिंग
Trending

पैशाचा पाऊस पाडण्याचे व काळ्या जादूद्वारे आजार बरे करण्याचे अमिष दाखवून आर्थिक व लैंगीक शोषण करून फसवणूक करणारा भोंदू बाबाच्या पारनेर पोलीसांनी आवळल्या मुसक्या.

संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा

दि. 23/06/2023         


             सविस्तर माहिती –

पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत काळ्या जादूचा वापर करून लोकांचे आर्थिक व लैंगीक शोषण करून फसवणूक करणारे लोक फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे, मा. श्री. संपतराव भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर व पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड सो, यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करून त्यांचेवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड यांनी त्यांच्या टीममधील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून असे कृत्य करण्या-या लोकांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

दिनांक- २१/०६/२०२३ रोजी पोलीस वरील कृत्य करणा-या लोकांबाबत माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, पारनेर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील एका कुटुंबाला योगी महादेवनाथ बाबा नावाचे एक भोंदू बाबा ने तो देवऋशी असल्याचे भासवून त्यांच्या घरातील अडचणींचे निवारण करण्यासाठी होम हवन करण्याचे अमिष दाखवून त्यांचेवर लैगीक अत्याचार करून त्यांचेकडून रोख रक्कम स्विकारून फसवणूक केली आहे. त्यावरून सदर कुटुंबाची माहिती घेऊन विचारपूस करत असताना सदर भयभीत झालेले कुटुंब पोलीसांकडे तक्रार देण्यासाठी घाबरत होते. परंतू त्यांना पोलीसांनी विश्वासात घेऊन त्यांना विचारपूस केल्यावर त्यांची सदर भोंदू बाबा याने तो देवऋशी असल्याचे भासवून त्यांच्या घरातील मरणा-या मेंढ्या मरू न देण्यासाठी, घरातील लोकांचे आजारपणाचे निवारण करण्यासाठी तसेच मुलीचे आजारपण दूर करण्यासाठी जादूटोणा करून होम हवन करण्याचे तसेच त्यांचे घरी पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून तसेच घरातील मुलीचे आजारपण दूर करण्याची पूजा करण्यासाठी त्याचे व तिचे लग्नात काढतात तसे गळ्यात हार व मंगळसूत्र घालतानाचे फोटो काढण्यास भाग पाडून त्याद्वारे त्यांना ब्लॅकमेल करून तसेच एअरगनचा धाक दाखवून पीडीतेवर लैगीक अत्याचार करून तिचे कुटुंबाकडून वरील जादूटोणा करण्यासाठी वेळोवेळी ५,५०,०००/- रूपये स्विकारून त्यांचे आर्थिक व लैंगीक शोषन करून फसवणूक केली आहे. त्याबाबत पीडीतेच्या फिर्यादीवरून भोंदू बाबा योगी महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे वय ४२ वर्षे रा- शिर्सुफळ, अटोळेवस्ती, मधलावाडा मराठी शाळेजवळ, बारामती जिल्हा-पुणे याचेविरूद्ध पोलीसांनी पारनेर पोलीस स्टेशनाल दि. २१/०६/२०२३ रोजी गु.र.नं. ५३६ / २०२३ भा.द.वि कलम ३७६ (२) (एन), ३५४(अ), ५०६, ४२० सह महाराष्ट्र नरबळी आणि ईतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करणे करिता व त्यांचे समुळ उच्चाटन करिता अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे असा गुन्हा केल्या असून त्याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर श्री. संपतराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, सहा फौज. शिवाजी कडूस, पो.हे.कॉ. गणेश डहाळे, जालींदर लोंढे, पो.ना. गहिणीनाथ यादव, पो.कॉ. सुरज कदम,अनिल रोकडे, मयुर तोरडमल, सारंग वाघ, सागर धुमाळ व विवेक दळवी व पथकाने केली आहे. पारनेर पोलीसांतर्फे पारनेर तालुक्यातील जनतेला अवाहन करण्यात येते की, सदर व्यक्तीने वेगवेगळ्या नावांचा वापर करून वेगवेगळे आजार दूर करण्यासाठी किंवा अडचणी दूर करण्यासाठी जर कोणाची फसवणू केली असेल तर त्यांनी तात्काळ पारनेर पोलीस स्टेशनला संपर्क करावा.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे