अहमदनगर जिल्ह्यात १७ ठिकाणी जबरी चोरी व घरफोडी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी ४२ तोळे ( ४ ९९ ग्रॅम ) सोन्याचे दागिने सह एकुण 23 लाख 52 हजार 500 / -रु . किं . चे मुद्देमालासह जेरबंद*
सविस्तर माहिती-अहमदनगर जिल्ह्यात १७ ठिकाणी चोरी घरफोडी करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. दिनांक २४/०२/२०२२ रोजी फिर्यादी श्री आनंदा बबन घुगार्ड , वय ५४ , रा . घुगाडेवस्ती , चास , ता . नगर हे कुटूंबासह कामानिमित्त बाहेर गेले असतांना अनोळखी चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे पाठीमागील दरवाजाची कडी हात घालून उघडून , घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण [ २,३२,६०० / – रु . किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला होता . सदर घटनेबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा . १०८/२०२२ भादवि कलम ४५४ , ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . श्रीगोंदा , कर्जत , जामखेड , नगर तालुका , पाथडी , शेवगांव व राहूरी परिसरामध्ये अशा प्रकारचे जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे घडलेले असल्याने मा . पोलीस अधिक्षक सो , अहमदनगर यांचे आदेशाने श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमले होते.पोनि / अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि , वरील नमुद गुन्हा हा आष्टी , जिला बीड येथील सराईत गुन्हेगार राम बाजीराव चव्हाण , रा . आष्टी , जिल्हा बीड व त्याचे साथीदारांनी मिळून केलेला असून राम चव्हाण व त्याचे साथीदार हे चोरलेले सोन्याचे दागिण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी लाल व काळ्या रंगाच्या शाईन व यूनिकॉन मोटार सायकलवर अहमदनगर येथे येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार अशांनी मिळून दोन पंच व पंचनामा करण्याचे साहित्यासह शासकिय वाहनाने आठवड घाट , नगर जामखेड रोड येथे जावून शासकिय वाहने आड बाजुला लावून व सापळा लावला असतांना मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीताचा शोध घेत असतांना आष्टी कडून अहमदनगरच्या दिशेने तीन मोटार सायकली त्यात एक लाल व एक काळ्या रंगाची हिरो होंडा शाईन व एक होंडा कंपनीची यूनिकॉन मोटारवर प्रत्येकी दोन – दोन इसम येत असतांना दिसले पोलीस पथकाची खात्री होताच सदर इसमांना थांबण्याचा इशारा करताच ते पळून जाण्याचे तयारीत असतांना पोलीस पथकाने दोन मोटार सायकलवरील चार संशयीत इसमांना पाठलाग करुन , शिताफीने ताब्यात घेतले . तसेच त्यांचे पाठीमागील युनिकॉन मोटार सायकलवरील दोन इसम मोटार सायकल तेथेच टाकुन घाटामध्ये पळू लागले पोलीस पथकने त्यांचा पाठलाग केला . परंतु ते मिळून आले नाही . दोन शाईन मोटार सायकलवर मिळून आलेल्या इसमांना पोलीस पथकाने स्वतःची व पंचाची ओळख करूनदेवून त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्याचे नाव १ ) राम बाजीराव चव्हाण वय २० , रा . आष्टी , जिल्हा बीड , २ ) तुषार हवाजी भोसले , रा . पिंपरखेड , ता . आष्टी , जि . बीड , ३ ) प्रविण उर्फ भाज्या हवाजी भोसले , ४ ) विनाद हवाजी भोसले , दोन्ही रा . पिंपरखेड , ता . आष्टी जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले .मिळुन आलेल्या वरील संशयीत चार इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात मिळून आलेल्या मोटार सायकलचे सिटाखाली व तुषार भोसले याचे कब्जातील कापडी पिशवीमध्ये विविध प्रकारचे सोन्याचे दागिने त्यामध्ये राणीहार , गंठण , मणीमंगळसुत्र , कानातील झुंबर , अंगठ्या , चैन , टॉप्स , नेकलेस , डोरले , कानातील वेल , बोरमाळ बांगड्या असे एकुण ४२ तोळे वजनाचे ( ४ ९९ ग्रॅम वजनाचे ) तसेच राम चव्हाण याचे अंग झडतीमध्ये ३ ९ , ५०० / – रु . रोख रक्कम व तीन मोटार सायकल असा एकुण २३,५२,५०० / -रु.कि.चा मुरेमाल मिळुन आला . नमुद मुरेमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्रीमती स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधीक्षक , श्रीरामपूर व श्री . आण्णासाहेब जाधव साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , कर्जतविभाग , श्री . संदीप मिटके साहेब , उपविभागीय पोलीस अधीकारी , श्रीरामपूर विभाग व श्री . सुदर्शन मुंढे साहेब ,उपविभागीय पोलीस अधिकारी , शेवगांव विभाग व श्री . अजित पाटील साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर ग्रामिण विभाग अहमदनगर अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि / श्री अनिल कटके तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.