
संतोष औताडे-मुख्य संपादक नेवासा ,दिनांक:- ९१/११/२०२३
खडका फाटा, ता. नेवासा येथे २ प्रवाशांना लुटणा-या टोळीतील
३ सराईत आरोपी, ५,२७,०००/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद,
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. तुषार हरीभाऊ राहिंज वय २१, रा. शिरापुर आर्वी,
ता. शिरूर कासार, जिल्हा बीड व साक्षीदार हे पैसे घेवून त्यांचे नातेवाईकांकडे जाताना खडका फाटा ते
नेवासा जाणारे रोडवर लघुशंकेसाठी थांबलेले असताना अनोळखी ८ ते ९ पुरुष व १ महिला आरोपींनी
फिर्यादी व साक्षीदार यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील २,२४,२००/- रुपये किंमतीचा माल दरोडा
चोरी करुन घेवुन गेले होते. सदर घटने बाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे १०४२ / २०२३ भादविक ३९५
प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी
पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन
गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी दिनांक ३१/१०/२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील
पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/ दत्तात्रय हिंगडे, विजय वेटेकर, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार,
पोना/रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, विशाल दळवी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, पंकज व्यवहारे, संदीप
चव्हाण, फुरकान शेख, संतोष खैरे, पोकॉ/ रोहित मिसाळ, मच्छिंद्र बर्डे, रणजीत जाधव, भाऊसाहेब काळे,
अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, व चापोहेकॉ/संभाजी कोतकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे
पथक नेमून अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींकडे तपास करणे बाबत आवश्यक सुचना देवुन
पथकास रवाना केले. पथकाने स्थानिक गुन्हे शाखेकडे उपलब्ध असलेले रेकॉर्डवरील आरोपींचे फोटो
फिर्यादी व साक्षीदार यांना दाखवुन संशयीतांची ओळख पटवित असताना फिर्यादी व साक्षीदार यांनी संशयीत
आरोपी नामे प्रशांत भोसले व विक्रांत भोसले दोन्ही रा. बुरुडगांव, ता. नगर यांना ओळखले. त्यावरुन
पथकाने लागलीच संशयीत आरोपींचा बुरुडगांव, ता. नगर परिसरात शोध घेत असताना मिळालेल्या
गुप्तबातमीनुसार संशयीत आरोपी जिल्हा परिषद शाळे जवळ बसलेले आहेत आता गेल्यास मिळुन येईल
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावुन शोध घेत असताना काही इसम पोलीस
पथकाची चाहुल लागताच पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात
घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता
त्यांनी त्यांची नावे १) प्रशांत ऊर्फ पप्पु रजनीकांत भोसले वय २९, २) विक्रांत रजनीकांत भोसले वय २७,
३) सतिष विनायक तांबे वय ३९ सर्व रा. बुरुडगांव रोड, ता. नगर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर
नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले त्यांना अधिकविश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्यांनी त्यांचे इतर साथीदार नामे ४) जनक चव्हाण
(फरार), ५) रमेश चव्हाण (फरार), ६) शिवम शिवाजी चव्हाण रा. वाळकी, ता. नगर (फरार), ७) कविता
पप्पु ऊर्फ प्रशांत भोसले रा. बुरुडगांव, ता. नगर हल्ली रा. ( फरार), ८) निलेश बाबुशा पवार (फरार), ९)
लखन कांतीलाल पवार (फरार), १०) धिरज कांतीलाल पवार अ.क्र. ७ ते १० रा. सावदरवाडी ता. परांडा,
जिल्हा धाराशिव अशांनी मिळुन गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातुन ५,००,०००/- रुपये किंमतीची शेव्हरलेट कंपनीची कॅप्टीव्हा
गुन्हा करताना वापरलेली कार, ५,०००/- रुपये रोख, २२,०००/- रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन व
फिर्यादी यांचे आधारकार्ड असा एकुण ५,२७,००० /- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन नेवासा
पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी नामे प्रशांत ऊर्फ पप्पु रजनीकांत ऊर्फ रजिक-या भोसले हा सराईत गुन्हेगार असुन आरोपी विरुध्द अहमदनगर,
बीड, ठाणे, पुणे, हिंगोली व वाशिम जिल्ह्यात खुनासह दरोडा, दरोडा तयारी, मोक्कयासह दरोडा व खुनाचा प्रयत्न असे
गंभीर स्वरुपाचे एकुण १० गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक
अहमदनगर, श्रीमती स्वाती
भोर मॅडम, अपर पोलीस
अधिक्षक, श्रीरामपूर व मा. श्री.
सुनिल पाटील साहेब,
उपविभागीय पोलीस
अधिकारी, शेवगांव विभाग यांचे
सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक
गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व
अंमलदार यांनी केलेली आहे.