विना नंबरप्लेट तसेच मॉडिफाय आवाज करणारे सायलेंसर असणा-या वाहनांवर कारवाई करणार – सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक – 02/09/2025
विना नंबरप्लेट तसेच मॉडिफाय आवाज करणारे सायलेंसर असणा-या वाहनांवर कारवाई करणार असल्याचे सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी सांगितले आहे. सविस्तर माहिती- दिनांक 1 सप्टेबर रोजी श्रीरामपूर शहरामध्ये विना नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर त्याचप्रमाणे मॉडीफाय सायलेंन्सर वापरणाऱ्या वाहन चालकांवर मोटर वाहन कायद्याखाली कारवाया करण्यात आल्या.
शहरामध्ये अनेकदा मूळ कंपनीचे सायलेंन्सर बदलून विनापरवानगी मोठ्या कर्ण कर्कश असे आवाज करणारे सायलेंन्सर, तसेच फटाके फोडणारे सायलेंन्सर गाड्यांना लावले जाते त्यामुळे नागरिकांना, वयस्कर नागरिकांना, महिलांना,लहान मुलांना त्याच्या आवाजाचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
त्याप्रमाणे विना नंबर प्लेट च्या गाड्या देखील विविध गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर काल संपूर्ण शहरांमध्ये अशा वाहनांवर कारवाया करण्यात आल्या.
एकूण 97 वाहन चालकांवर या कारवाया काल केल्या त्यापैकी 48 विना नंबर प्लेट असणारी वाहने पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करण्यात आली. त्यांच्यावर मोटर वाहन कायद्याखाली दंडात्मक कारवाई केली त्याचप्रमाणे नंबर प्लेट जागेवरच टाकून घेण्याची देखील कारवाई करण्यात आली.
याशिवाय मॉडीफाय सायलेंन्सर असणारी 6 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली त्यांचे मॉडिफाय अर्थात विनापरवाना लावलेले सायलेंन्सर काढून मूळ कंपनीचे सायलेंन्सर बसवून त्या गाड्या सोडण्यात आल्या.
यापुढे देखील शहरात सातत्याने अशी कारवाई करण्यात येणार आहे.सर्वच वाहन चालकांनी दोन्ही नंबर प्लेट सुस्थितीत असल्याची खात्री करावी. त्याप्रमाणे मॉडीफाय सायलेंन्सर कोणी वापरत असाल तर तात्काळ बदली करून मूळ कंपनीचे सायलेंन्सर बसविण्यात यावे असे आवाहन सोमनाथ वाघचौरे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी केले आहे.