संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक-13/03/2024
मोटर सायकल चोरणारे मध्यप्रदेशातील दोन आरोपी पोलिसांकडून अटक.
प्रस्तुत घटना अशी की राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 198/2024 भादवि कलम 379 प्रमाणे फिर्यादी प्रशांत शहाजी आवटी राहणार पुष्पक अपार्टमेंट कॉलेज रोड राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी गुन्हा दाखल केला होता. दाखल गुन्ह्यातील आरोपी यांना दिंडोरी नाशिक परिसरात चोरी करत असताना पकडल्यानंतर त्यांनीच राहुरी येथील चोरी केलेली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे साहेब यांना मिळाल्याने त्यांनी लागलीच एक पोलीस पथक नेमून सदर गुन्ह्यांमधील आरोपी यांना दिंडोरी पोलिसांकडून सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन खात्री करून अटक करणे बाबत सूचना दिल्याने आरोपी नामे 1) दिलीप रुमाल सिंग जाधव राहणार नवलपुरा तालुका सेंधवा जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेश 2) अनिल छत्रसिंग डावर राहणार छोटा जुलवानिया तालुका सेंधवा जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेश येथील रहिवासी असलेले आरोपी यांना राहुरी पोलिसांनी दिंडोरी नाशिक येथून दाखल गुन्ह्यातील मोटर सायकल सह वर्ग करून अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपींनी घरपुडी चोरी केलेली असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना मा. न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास पोलिस हवलदार विकास वैराळ करत आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर , श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली सहायक फौजदार गीते, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके, विकास वैराळ, नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सुरज गायकवाड, राहुल यादव,पोलीस कॉन्स्टेबल अंकुश भोसले, जयदीप बडे,गोवर्धन कदम, नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे.