संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा, दिनांक -27/01/2024
भेंडा येथे सापडला बेवारस मृतदेह सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील व्यापारी दुकान लाईन जवळ काळा रंगाचा शर्ट, व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला अंदाजे 45 वर्ष वयाचा एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने भेंडा परिसरात एकच खळबळ उडाली होती. सदर घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलिस स्टेशन चे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा करून सदर व्यक्तिचा मृतदेह नेवासा फाटा येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला असून पुढील तपास नेवासा पोलिस करीत आहेत.