तेलकुड़गावच्या ट्रक चालकाची भेंड़यात गळफास घेऊन आत्महत्या “हिट अँन्ड रन कायद्याला कंटाळुन आत्महत्या केल्याची खिशात चिठ्ठी तर घातपात झाल्याचा मुलाचा संशय”
संतोष औताडे – मुख्य संपादक, नेवासा दिनांक – 14/01/2024
तेलकुड़गावच्या ट्रक चालकाची भेंड़यात
गळफास घेऊन आत्महत्या
“हिट अँन्ड रन कायद्याला कंटाळुन आत्महत्या केल्याची खिशात चिठ्ठी तर घातपात झाल्याचा मुलाचा संशय”
सविस्तर माहिती-:– नेवासा तालुक्यातील
तेलकुड़गावयेथील 53 वर्षीय ट्रक चालकाने भेंड़यात झाडाला काथयाची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.केंद्र सरकारच्या हिट अँन्ड रन कायद्याला कंटाळुन आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी मयताचे खिशात आढळून आली आहे.दरम्यान ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय मयताचे मुलाने पोलिस यंत्रणेकडे व्यक्त केला आहे.
बाबद अधिक माहिती अशी की,
तेलकुड़गाव येथील ट्रक चालक भाऊसाहेब विश्वनाथ थोरात (वय 53 वर्षे) यांचा मृतदेह भेंडा ज्ञानेश्वर साखर कारखाना कामगार वसाहातीतील झाडाला गळफास घेतल्याचे अवस्थेत आढळून आला. मयताचे खिशात आधार कार्ड व एक चिठ्ठी आढळून आली.त्या चिठ्ठीत लिहिले आहे की, केंद्र सरकारने केलेल्या ड्रायव्हर विरोधी कायद्याला मी कंटाळुलो आहे. अपघात झाल्यास १० वर्ष शिक्षा व ७ लाख रुपये दंड असा कायदा केला आहे. मी नॅशनल हायवेवरील एक ट्रक ड्रायव्हर असुन माझी घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. बायको व मुले सणासाठी माझी वाट पाहत आहे.परतु माझ्याकडे पैसे नाहीत. वारंवार प्रयत्न करून मला रेशनकार्ड मिळाले नाही. माझा एक मुलगा मतिमंद असुन त्याला शासनाकडून कोणत्याही सुविधा मिळत नाही. सरकारच्या या निर्णयामुळे आम्ही ड्रायव्हरने कसे जगावे.पैसे नसताना मी इंदौर वरुन इथ पर्यंत आलो.माझ्या मृत्युला कोणालाही जबाबदार धरू नका असा उल्लेख आहे.
दरम्यान माझे वडील फार शिकेलेले नाहीत, या चिठ्ठीतील हस्ताक्षर माझ्या वडिलांचे नसून ती चिठ्ठी दुसऱ्या कोणी तरी लिहिली असावी असा संशय मयताचे
मुलाने पोलिस यंत्रणेकडे व्यक्त केला आहे.
या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पो.कॉ. श्री. रामेश्वर घुगे हे पुढील तपास करित आहे.