श्रीरामपूर शहरात बनावट दारूची निर्मिती चे अवैध स्पिरीट जप्त.राज्य उत्पादन शुल्क व अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांची संयुक्त कामगिरी

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा, दिनांक -30/07/2025
श्रीरामपूर शहरात बनावट दारूची निर्मिती चे अवैध स्पिरीट जप्त
सविस्तर माहिती- श्रीरामपूर शहरात बनावट दारूची
निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी
छापा टाकून अवैध स्पिरीट जप्त केले.
अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि
राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल
दुपारी बाजारतळ आणि खबडी परिसरात
ही कारवाई केली आहे.
याबाबत
पोलिसांनी
दिलेल्या
माहितीनुसार, शहरात बनावट दारूची
निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती दाराकडुन
श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक
सोमनाथ वाघचौरे साहेब यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीवरून अपर पोलीस
अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर व राज्य उत्पादन
शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करून
सदर ठिकाणी छापा टाकला असता,
तेथे बनावट दारू तयार करत असल्याचे
आढळून आले.
अपर पोलीस कार्यालय आणि राज्य
उत्पादन शुल्क विभागाने काल दुपारी
शहर परिसरात विविध ठिकाणी कारवाई
करत सुमारे अवैध स्पिरीट संबंधित
आरोपीकडून जप्त करण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क
विभागाच्या संयुक्त कारवाईत काल हा
छापा टाकून अवैध स्पिरीटसह बनावट
दारू बनवलेल्या विविध कंपनीच्या
दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या
आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने काल वॉर्ड
नं. ३ बाजारतळ आणि वॉर्ड नं. १ खबडी येथून
बनावट विदेशी दारू निर्मिती केंद्रावर छापा
टाकून अवैध साठा, असा एकूण ७९ हजार
९७० रुपयांचे साहित्य जप्त केले. असून ही कारवाई राज्य
उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोनसह
इतर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच
अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने संयुक्त
मोहिम राबवून केली. याबाबत पुढील तपास
निरीक्षक देशमाने करीत आहे.
त्यांच्या ताब्यातून बनावट विदेशी दारू
आणि दारू बनवण्याचे साहित्य जप्त
करण्यात आले आहे. सदरची कारवाई अपर पोलीस
अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर व राज्य उत्पादन
शुल्क विभागाने संयुक्त कारवाई केली आहे.