ब्रेकिंग
Trending

आपेगाव ता . कोपरगाव येथील वृध्द दाम्पत्याचा निघृणपणे खुन करुन जबरी चोरी करणारे तीन सराईत आरोपी जेरबंद.

संतोष औताडे (मुख्य संपादक )   दिनांक- 05 /05/ 2022


आपेगाव ता . कोपरगाव येथील वृध्द दाम्पत्याचा निघृणपणे खुन करुन जबरी चोरी करणारे तीन सराईत आरोपी जेरबंद.


सविस्तर माहिती- आपेगाव ता . कोपरगाव येथील वृध्द दाम्पत्याचा निघृणपणे खुन करुन जबरी चोरी करणारे तीन सराईत आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगांव तालुका पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई . फिर्यादी श्री . जालिंदर दत्तात्रय भुजाडे , वय ४० , रा . आपेगांव , ता . कोपरगांव हल्ली रा . संतोष नगर ( वाकी ) , ता . खेड , जिल्हा पुणे हे नोकरी निमित्ता कुटूबियासह पुणे येथे राहतात दिनांक ३०/०५/२२ ते दि .०१ / ०६ / २२ रोजीचे दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपींनी रात्रीचे वेळी घराचे छतावर प्रवेश करुन झोपेत असलेली फिर्यादीची आई राधाबाई दत्तात्रय भुजाडे , वय ६५ व वडील दत्तात्रय गंगाधर भुजाडे , वय ७५ अशा दोघांची अज्ञात हत्याराने हत्या करुन , घरातील कपाटाची उचका पाचक करून १ , ९ ०,००० / – रु . किंचे सोन्याचे दागिने खुनासह जबरी चोरी करुन चोरुन नेले होते .

 

सदर घटने बाबत कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. ९९ ७ / २०२२ भादविक ३०२ , ३ ९ ७ , ३ ९ ४ प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन मा . बी . जी . शेखर पाटील साहेब , विशेष पोलीस महानिरीक्षक , नाशिक परीक्षेत्र , नाशिक व मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक , अहमदनगर यांनी घटना ठिकाणास भेट देवुन , पोनि / श्री . अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले . त्याप्रमाणे पोनि / श्री . अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तीन विशेष पथके नेमून तपासाबाबत सुचना दिल्या होत्या . तपास करीत असतांना पथकास गुप्तबातमीदारा कडुन माहिती मिळाली की , सदरचा गुन्हा हा अजय काळे रा.पढेगांव , ता . कोपरगांव याने त्याचे साथीदारासह केला असुन तो त्याचे राहते घरी असुन कोठेतरी पळून जाण्याच्या तयारीत आहे . आता गेल्यास मिळूण येईल अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पथकातील पोनि / अनिल कटके , सपोनि / सोमनाथ दिवटे , पोसई / सोपान गोरे , सफी / बाळासाहेब मुळीक , मोहन गाजरे , पोहेकों / दत्तात्रय हिंगडे , सुनिल चव्हाण , पोना / शंकर चौधरी , विशाल दळवी , राहुल सोळंके , सचिन आडवल , संदीप चव्हाण , दिपक शिंदे , पोकों / सागर ससाणे , रोहित येमुल , रणजीत जाधव , चापोहेकॉ बबन बेरड , चंद्रकांत कुसळकर , अर्जुन बडे व चापोना / भरत बुधवंत तसेच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोनि . दौलतराव जाधव , सपोनि / सुरेश आव्हाड , पोहेकॉ / ईरफान शेख अशांनी मिळुन पढेगांव येथे जावुन आरोपी नामे अजय काळे याचे वास्तव्याबाबत माहिती घेत असतांना एक इसम पोलीसांची चाहुल लागताच पळन जावु लागला पथकातील अंमलदार यांनी संशयीत इसमाचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले . ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव ९ ) अजय छंद काळे वय १ ९ , रा . पढेगांव , ता . कोपरगांव असे असल्याचे सांगितले त्याचेकडे वरील नमुद गुन्हयाबाबत चौकशी करता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले त्यास अधिक विश्वासात घेवून कसुन चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नाम २ ) अमित कागद चव्हाण , वय २० , रा . हिंगणी हल्ली रा . पडेगांव , ता . कोपरगांपव ३ ) जंतेश छंदु काळे , वय -२२ रा.पढेगाव ता . कोपरगाव अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली .सदरची कारवाई (मा.श्री मनोज पाटील) पोलिस अधीक्षक अहमदनगर,(श्रीमती स्वाती भोर मॅडम) अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,श्री संजय सातव साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी शिडीऀ, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे