भेंडा येथील काविळ उपचार तज्ञ सुनिल वाबळे सरपंच सेवा संघाच्या वतीने आरोग्यभुषण पुरस्काराने सन्मानित.

(संतोष औताडे- मुख्य संपादक,नेवासा ) दिनांक-25/12/2022
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील सुनील वाबळे (काविळ उपचार तज्ञ) यांना स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श आरोग्य भुषण 2022 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुनील वाबळे यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून काविळ उपचार केंद्राच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला असुन त्यांच्या कार्याची दखल घेऊन स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय आदर्श आरोग्यभुषण पुरस्कार 2022 अहमदनगर येथील माऊली संकुल या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यासाठी ह.भ.प एकनाथ महाराज (भिवंडीकर),मा.खा भाऊसाहेब वाकचौरे,मा. यादवराव पावसे, मा.घनशाम दराडे (छोटा पुढारी), संतोष औताडे (पञकार), मा. बाबासाहेब पावसे, रविंद्र पवार, दिपक कुमार भट्ट,मा.शरदराव आरगडे तसेच परिसरातील नागरिक व स्वराज्य सरपंच सेवा संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.