राहुरी तालुक्यातील उंबरे शिवारातील तांबे पेट्रोलपंपाशेजारील १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीची लोखंडी स्टील मुद्देमाल चोरणारी टोळी गजाआड,

संतोष औताडे (मुख्य संपादक- नेवासा) दिनांक 22/12/2022
प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की , राहुरी पोस्टे गु.र.नं। १ ९ ५६ / २०२२ भादवि कलम ३७ ९ प्रमाणे दाखल गुन्ह्यतील स्टील चोरी करणारे आरोपी व मुद्देमाल तात्काळ शोध घेणेबाबत मा . श्री . राकेश ओला सो , पोलीस अधिक्षक सो अनगर व श्रीमती भोर मॅडम , अपर पोलीस अधिक्षक , श्रीरामपुर भाग यांनी पोनि / प्रताप दराडे यांना तात्काळ कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते . सदर आदेशाप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनकडील पोनि / प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करणेत आली आहे नमुद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांनी राहुरी पोलीस स्टेशनकडील कारवाई करणेकामी पोसई खोंडे , सफी / चंद्रकांत ब – हाटे , पोहेकॉ / दिनकर चव्हाण , पोहेकॉ / सोमनाथ जायभाय पोना / अमित राठोड , पोकॉ / अदिनाथ पाखरे , पोकॉ / सचिन ताजणे , पोकॉ / संतोष राठोड , पोकॉ / गणेश लिपणे , पोकॉ / नदिम शेख पोकॉ / अमोल पडोळे यांचे विशेष पथक नेमण्यात आले होते . सदर बाबत पोनि प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि आरोपी नामे १ ) अभिषेक बाबासाहेब हुडे २ ) हर्षल दत्तात्रय ढोकणे दोघे रा.उंबरे ता . राहुरी यांनी गुन्हा केलेला आहे . गोपनीय माहीती मिळाल्याने सदर आरोपी यांना सापळा लावुन उंबरे शिवारात जेरबंद करुन त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता सदरचा गुन्हा हा आम्ही व ३ ) जयेश उर्फ गुलाब बाबासाहेब ढोकणे ४ ) छोट , उर्फ सौरभ संजय दुशिंग ( ५ ) राहुल दादु वैरागळ सर्व रा.उंबरे ता . राहुरी जि . अनगर असे आम्ही मिळून केल्याची कबुली दिली आहे . सदर आरोपी यांनी गुन्ह्यातील एकुन मुद्देमाल १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे लोखंडी स्टील व गुन्हा करणेकामी वापरलेले महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर TATA कंपनीची ACE मॉडेलची गाडी हे आरोपींनी दाखवल्याने वरील मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे . सदरची कारवाई मा . श्री राकेश ओला सो , पोलीस अधिक्षक अ.नगर , श्रीमती स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर भाग व श्री संदिप मिटके सो , उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.