
संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा दिनाक -29/04/2023
नेवासा तालुक्यातील धक्कादायक घटना अंगावर वीज पडून शाळकरी मुलाचा मृत्यू .सविस्तर महिती – नेवासा तालुक्यातील म्हसले ता-नेवासा येथे धक्कादायक घटना घडली आहे.अंगावर वीज पडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. साई राजेंद्र शिरसाठ वय वर्षे-10 असे या मुलाचे नाव असून.उपचारासाठी नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. याबाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे जबाब दाखल करण्यात आला आहे.कि. मी हरीभाऊ कचरु शिरसाठ वय 35 वर्ष धंदा मजुरी रा म्हसले ता नेवासा जिल्हा अ नगर 
समक्ष नेवासा पोलीस स्टेशनला हजर
होवुन लेखी तक्रार लिहून देतो की मी वरील ठिकाणी
• कुटुंबासह राहवयास असुन मजुरी करुन स्वताची उपजिवीका भागवीतो.
दिनांक 28/04/2023
रोजी दुपारी 12/00 वा मी माझे घरी असताना पाउस व बारा जोराचा
चालु असताना शेतामध्ये आईसोबत कांदे झाकण्यासाठी गेला असता अचानक पणे विज पडल्याचा
आवाज आम्हाला आल्यामुळे आम्ही शेताकडे गेलो असता तेथे माझा पुतण्या साई राजेद्र शिरसाठ वय
10 वर्ष हा खाली पडला असल्याचा दिसला त्यानंतर आम्ही त्याला घेवुन ग्रामीण रुग्णालय नेवासा
फाटा येथे घेवुन आलो असता तेथील डॉक्टरांनी उपचारा पुर्वी मयत झाला आहे असे सांगितले.
त्यानंतर आम्ही ग्रामीण रुग्णालयाचा दवाखान्यातील मेमो घेवुन नेवासा पोलीस स्टेशनला खबर देण्यासाठी
आलो आहेत. सध्या सगळीकडे अवकाळी पावसामुळे थैमान घातले आहे.नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
				 
					 
						


