उस्तळ दुमाला येथे क्रुझर व ट्रक चा भिषण अपघात एक जण जागीच ठार . 11 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल.

संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा, दिनांक -09/06/2025
सविस्तर माहिती- अहिल्यानगर संभाजी नगर रोडवरील नेवासा तालुक्यातील उस्तळ दुमाला येथे आज पहाटे क्रुझर गाडी व ट्रक चा भिषण अपघात झाला. तालुका बोदवड जिल्हा जळगाव येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीतील 13 मुले MPL क्रिकेट पाहण्यासाठी गहुंजे, पुण्याला गेले होते. पुण्याहून परत बोदवड जिल्हा जळगाव येथे माघारी परतत असताना अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातील उस्तळ दुमाला गावाचे हद्दीत पहाटे 05.15 वाजण्याच्या सुमारास क्रुझर गाडी MH-20 DJ 4834 गाडी समोरच्या ट्रक क्रमांक MH-11 AL5117 या ट्रक घ्या मागील बाजूस डॅश केल्याने क्रुझर गाडीमधील प्रथमेश तेली नावाचा एक मुलगा जागेवरच मयत झालेला आहे. आणखी एक वृषभ सोनवणे नावाचा मुलाचाही साईदिप हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गाडी मधील इतर जखमीं
11 मुलांवर नेवासा फाटा येथे उपचार चालू आहे. यामध्ये क्रुझर गाडी चे भरपूर प्रमाणात नुकसान झाले असून हा अपघात क्रुझर गाडीच्या ड्रायव्हर च्या चुकीमुळे झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून. चालक अविनाश उर्फ रोशन गोकुळ सिंग निकम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे .. या घटनेची फिर्याद प्रशिक्षक गौरव सुनील भोईर यांनी दिली आहे.. सदर घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव साहेब व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. या घटनेचा पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.