८०,००० / – रु.किं .चे चोरीस गेलेले सोन्याचे दागिण्यासह एक महिला आरोपी कोतवाली पोलीसांनी केली जेरबंद.

संतोष औताडे (मुख्य संपादक, नेवासा ) दिनांक-24/07/2022
८०,००० / – रु.किं .चे चोरीस गेलेले सोन्याचे दागिण्यासह एक महिला आरोपी कोतवाली पोलीसांनी केली जेरबंद.
सविस्तर माहिती-. ८०,००० / – रु.किं .चे चोरीस गेलेले सोन्याचे दागिण्यासह एक महिला आरोपीला अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.यामधे १ ) ४०,००० / – रु.किचे एक सोन्याचे गंठण त्यामध्ये सोन्याचे मणी व डिझाईन पत्ता असलेले अंदाजे एक तोळा वजनाचे जुवाकिअ २ ) २०,००० / – रु.किचे एक सोन्याचे गंठण त्यामध्ये सोन्याचे मणी व डिझाईन पत्ता असलेले अंदाजे अर्धा तोळा वजनाचे जुवाकिअ . दि . २२/०७/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते १०.३० वा . सुमा . फिर्यादी नामे लिलाबाई विश्वनाथ वाघमारे वय ६५ वर्षे धंदा घरकाम रा . नगर दौंड रोड हनुमान नगर अहमदनगर यांचे राहाते घरामध्ये त्यांची मावस नात सुन नामे माया मार्कस तिजोरे रा . इंदिरानगर हनुमान नगर दौंड रोड अहमदनगर होने उघडया दरवाजावाटे फिर्यादीच्या घरामध्ये प्रवेश करुन हॉल मधील कपाट उघडून कपाटात ठेवलेली लॉकरची चावी घेऊन लॉकर उघडून ८०,००० / – रु.किचे सोन्याचे दागिणे त्यामध्ये एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठण , अर्धा सोन्याचे दागिने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरी करुन नेले आहे . अशा फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुरन ५७४/२०२२ भादवि- ३८० प्रमाणे दि . २२/०७/२०२२ रोजी १७.१४ वा . गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्हा दाखल होताच गुन्हाचे तपासकामी पोनि / संपतराव शिंदे यांनी तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार व महीला अंमलदार यांना सदर महीलेचा शोध घेणेबाबत आदेश दिले त्यावरुन सदर पथकाने महीला आरोपीचे राहाते घरी जावुन तपास केली असता सदर ठिकाणी महीला आरोपी नामे माया मार्कस तिजोरे वय ३५ रा . इंदीरानगर अहमदनगर हि मिळुण आली सदर गुन्हातील चोरीस गेले मालाबाबत तीचेकडे चौकशी केली असता तीने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिले परंतु तीची घरझडती घेतली असता तीचे राहते घरातील कपाटात चोरीस गेला खालील वर्णनाचा माल मिळुण आला आहे . ३ ) २०,००० / – रु . किचे सोन्याचे मणी असलेली भोरमाळ जुवा . वरिल प्रमाणे कायदेशिर कारवाई करून एकुण ८०,००० / – रुपये किंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री . मनोज पाटील सा . , अपर पोलीस अधीक्षक श्री . सौरभकुमार अग्रवाल सो . , मा . उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि . श्री . संपतराव शिंदे , पोहेकॉ / शरद गायकवाड , पोना / योगेश भिंगारदिवे , पोकॉ / दिपक रोहकले , पोकॉ / अमोल गाडे , पोकॉ / सुजयराव हिवाळे , पोकॉ सोमनाथ राउत , पोकॉ तान्हाजी पवार , पोकॉ / संदीप थोरात , पोकॉ / अभय कदम , पोकॉ / अतुल काजळे , मपोहेकॉ / कल्पना आरवडे चापोहेकॉ / सतीष भांड व पोकॉ / प्रशांत बोरुडे यांनी केली आहे.