गुन्हेगारी
Trending

श्रीरामपूर शहरात विक्री करण्याचे उद्देशाने आठ ( ०८ ) गावठी कट्टे व दहा जिवंत काडतुस बेकायदशिररित्या कब्जात बाळगणा – या तीन आरोपींची टोळी जेरबंद

संतोष औताडे ( मुख्य संपादक ).    दिनांक : – १८ /०६ /२०२२


श्रीरामपूर शहरात विक्री करण्याचे उद्देशाने आठ ( ०८ ) गावठी कट्टे व दहा जिवंत काडतुस बेकायदशिररित्या कब्जात बाळगणा – या तीन आरोपींची टोळी जेरबंद


सविस्तर माहिती- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई . मा . श्री . मिलींद भारंबे , विशेष पोलीस महानिरीक्षक , कायदा व सुव्यवस्था , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांनी दिनांक १६/०६/२२ ते ३०/०६/२२ या कालावधी दरम्यान अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाबत विशेष मोहिमेचे आयोजन करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते लव. नमुद आदेशा नुसार मा . श्री . बी . जी . शेखर पाटील साहेब , विशेष पोलीस महानिरीक्षक , नाशिक परीक्षेत्र , नाशिक व मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक , अहमदनगर पोनि / श्री . अनिल कटके , स्थागुशा अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाबत जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले

. नमुद सुचना व मार्गदर्शना प्रमाणे श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर हे अहमदनगर जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्र व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना पोनि / श्री . कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि , दाढी वाढलेले तीन इसम हे गावठी कट्टे व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी हॉटेल राधिकाचे पार्किंग जवळ ता . श्रीरामपूर येणार आहे . आता लागलीच गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि / अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले . नमुद आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि / सोमनाथ दिवटे , सफी / राजेंद्र वाघ , सफी / संजय खंडागळे , पोहेकॉ / बापुसाहेब फोलाणे , देवेंद्र शेलार , पोना / भिमराज खर्से , शंकर चौधरी , सुरेश माळी , रवि सोनटक्के , पोकॉ / मयुर गायकवाड , सागर ससाणे व चापोहेकॉ / चंद्रकांत कुसळकर अशांनी मिळून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी हॉटेल राधिकाचे पार्किंग जवळ , श्रीरामपूर , ता . श्रीरामपूर येथे जावून सापळा लावला . त्यानंतर थोड्याच वेळात हॉटेल राधिकाचे गाड्यांचे पार्किंगकडे दाढी वाढलेले तीन इसम आजुबाजूला संशयीतरित्या टेहळणी करत पायी येतांना दिसले . पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीत इसमांना घेराव घालून ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना संशयीत इसमांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळुन जावू लागले . पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीतांचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले . ताब्यात घेतलेल्या संशयीत तीनही इसमांना त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १ ) राहुलसिंग फत्तुसिंग कलानी वय २५ , २ ) आकाशसिंग बादलसिंग जुनी , वय २२ , ३ ) अक्षयसिंग तिलकसिंग कलानी वय २२ सर्व रा . श्रीरामपुर बाजारतळ , गुरुगोविंदसिंग नगर , वॉर्ड नं . ३ , ता . श्रीरामपुर असे असल्याचे सांगीतले . त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये आठ ( ०८ ) गावठी बनावटी कड्डे , वहा ( १० ) जिवंत काडतूसे व सॅक असे एकूण २,४५,१०० / – रु.किं.चा मुद्देमाल मिळून आल्याने ते जप्त करण्यात आला . नमुद तीन इसम हे श्रीरामपूर शहरात आठ ( ०८ ) व वहा ( १० ) जिवंत काडतूसे विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत सफी / राजेंद्र देवमन वाघ ने . स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन आर्म अॅक्ट कलम ३/२५ , ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे . सदर कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्रीमती . स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधीक्षक , श्रीरामपूर , श्री . संदीप मिटके साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपूर विभाग , यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे