ब्रेकिंग
Trending

*दरोड्याच्या तयारीत असणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद   01,83,615 / – रुपयांचा मुददेमाल जप्त*.

संतोष औताडे (मुख्य संपादक).     दिनांक -०४/०६ /२०२२


दरोड्याच्या तयारीत असणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद   01,83,615 / – रुपयांचा मुददेमाल जप्त.


सविस्तर माहिती-” दि . ०४/०६/२०२२ रोजी 02.10 वा . सुमारास पोसई निरज बोकील व चा.पो.ना. / 409 जालींदर आबाजी साखरे असे शासकीय पोलीस वाहन क्रमांक एम एच 16 सी.व्ही . 0895 सह विभागीय रात्रगस्त पेट्रोलींग करत असतांना त्यांना मल्हारवाडी रोड वरील सातपिरबाबा दर्गा पाठीमागे पाच इसम हे हातात शस्त्र घेवून दरोडा टाकण्याचे उददेशाने एकत्र जमलेले आहेत अशी माहिती मिळाली त्याप्रमाणे पोलिस आरोपीतांना पकडण्यासाठी गेले असता आरोपीतांना पोलीसांचा सुगावा लागल्याने पळु लागले त्यावेळी पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करु लागले पोसई निरज बोकील , पो.कॉ. 1291 नदिम जाफर महंमद शेख नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि . अहमदनगर यांनी आरोपी मयुर राजु ढगे वय 21 वर्ष , जळगांव फाटा निफाड , ता . निफाड जि.नाशिक यांस ताब्यात घेण्याकरता गेले असता आरोपीने त्याचे हातातील सत्तुर हत्याराने पोसई निरज बोकील यांच्यावर प्राणघात हल्ला करुन त्यांना जखमी केले तरीही पोसई निरज बोकील यांनी आरोपी मयुर राजु ढगे यांस अंत्यत शिताफीने पकडले . पो.कॉ. 2701 महेश बाळासाहेब शेळके याने आरोपी ईश्वर अशोक मोरे वय 20 वर्ष रा.संग्राम गल्ली , निफाड ता . निफाड जि . नाशिक यांस एकटयाने पाठलाग करुन अत्यंत शिताफीने पकडले आहे . आरोपी ( 1 ) रंजीत केशव कांबळे ( 2 ) अजय पवार ( 3 ) राहुल रमेश वाकोडे सर्व रा . संग्राम गल्ली निफाड ता . निफाड़ जि नाशिक हे अंधाराचा फायदा घेवून पळून गेले . सदर घटनेबाबत पोसई निरज जयंत बोकील राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 1462/2022 भा.दं. वि . कलम 399,353,333,402 सह भारतीय शस्त्र अधिनियम 4/25 प्रमाणे दाखल करण्यात आलेला असुन त्याचा तपास पोसई नान्हेडा हे करत आहेत . सदर आरोपीतांना मा . न्यायालयात हजर केले असता मा . न्यायालयाने आरोपीतांना दि . 08/06/2022 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे . दरोडयाची तयारीत असणारी सक्रीय टोळीस पकडण्यास पोलीस यश आल्याने अत्यंत कुशल व तांत्रीक पुराव्याचे आधारे गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपी रंजीत केशव कांबळे रा.संग्राम गल्ली निफाड ता . निफाड जि . नाशिक यांस शिर्डी येथुन व आरोपी राहुल रमेश वाकोडे रा . संग्राम गल्ली निफाड ता.निफाड जि.नाशिक यांस राहुरी फॅक्ट्ररी येथुन ताब्यात घेण्यात आलेले आहे . सदर गुन्हयातील आरोपी मयुर राजु ढगे यांचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . अ.क्र . पोलीस ठाणे गु.र.नंबर कलम 1). निफाड 231/2019 122 2) . 961/2020 घोटी अंबड 457,380 3) . 456/2021 452,380,411,294,427,504 , 506 , 34 4) . निफाड अंबड 129/2013 380,461 804/2021 5 . 6). निफाड 454,457,380 368/2020 454,457,380 , 34 आर्म अॅक्ट 4/25 . भद्रकाली निफाड इ.राहुरी पोलीसांना तक्रारी दिली त्यावरुन राहुरी पोलीस स्टेशनला गु.र.नं. 1463/2022 भा.दं. वि . कलम 397 , भारतीय शस्त्र अधिनियम 3/25 , 4/25 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे . सदर गुन्ह्यातील गेलेला माल हा राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1462/2022 भा.दं.वि. कलम 399,353,333,402 सह भारतीय शस्त्र अधिनियम 4/25 प्रमाणे गुन्हयामध्ये मिळुन आलेला आहे . राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे सतर्कमुळे गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघड झालेला आहे . 2/2 लीरु सदरची कारवाई मा . विशेष पोलीस महानिरीक्षक मा . श्री . शेखर पाटील , मा.श्री मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर , मा . अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम , श्री . संदिप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.प्रताप दराडे , पोसई नान्हेडा , पोसई निरज बोकील , पोहेकॉ १५ ९सोमनाथ जायभाय , चा.पो.ना. / ४० ९ जालींदर आबाजी साखरे , पो.कॉ. २७०१ महेश बाळासाहेब शेळके , पो.कॉ. १२ ९९ नदिम जाफर महंमद शेख , पोकॉ आजिनाथ पाखरे नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि . अहमदनगर यांनी केलेली आहे .

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे