
संतोष औताडे ( मुख्य संपादक- नेवासा) दिनांक- 20/10/2022
सविस्तर माहिती-
नेवासा तालुक्यातील विविध उपक्रम राबविणेस प्रसिध्द असलेली सौंदाळा ग्रामपंचायत मागील वर्षी प्रमाणे यंदाही मोफत साखर वाटुन ग्रामस्थांची दिवाळी गोड करणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच सौ प्रियंका शरदराव आरगडे यांनी सांगितले
दिवाळी निमित्त ग्रामस्थांना मोफत साखर वाटप करणारी महाराष्ट्रात एकमेव सौंदाळा ग्रामपंचायत होती मागील वर्षा प्रमाणे यंदाही प्रती व्यक्ती दिड किलो प्रमाणे कुठलीही अट न ठेवता सरसगट ग्रामस्थांना साखर वाटप करण्यात येणार आहे
यंदा अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास वाया गेला शेतकरी पिकांचे १००% नुकसान झाल्याने हवालदिल झाला आहे अशा अवस्थेत ग्रामस्थांची दिवाळी गोड करण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामपंचीयतीने एकमताने घेऊन सौंदाळा ग्रामस्थांना दिवाळी भेट दिली आहे
या करीता उपसरपंच सौ लताबाई आरगडे,सचिन आरगडे,रामकिसन चामुटे,सविता रेवननाथ आरगडे,सुरेखा बाळासाहेब बोधक, रुक्मीणी मारुती आरगडे,कानिफनाथ आरगडे,जगन्नाथ आढागळे,उषा बबन आरगडे यांनी एकमताने ठराव घेतल्याने त्यांचे मा,आ,शंकरराव गडाख,मा,आ,चंद्रशेखर घुले व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ,बाबा आरगडे यांनी अभिनंदन केले आहे.