
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा. दिनांक :- 12/02/2024
———————————————————
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात, सफौ/भाऊसाहेब काळे, पोना/रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, संदीप दरंदले, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, पोकॉ/ बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, चासफौ/उमांकात गावडे यांचे पथक तयार करुन जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेकामी सुचना देवुन पथकास रवाना केले.
वरील पथक जिल्ह्यातील यापुर्वी अग्शिस्त्रे बाळगणारे इसमांचे रेकॉर्ड तपासुन अग्निशस्त्राची माहिती काढत असतांना पोनि श्री दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत लखन भाऊसाहेब आल्हाट रा. नेवासा हा त्याचे साथीदारासह विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा (अग्निशस्त्र) आपले कब्जात बाळगुन ते विक्री करण्याचे उद्देशाने भिस्तबाग महालासमोर, सावेडी परिसरामध्ये येणार असल्याची बातमी मिळाल्याने सदर बातमीची हकीगत वरील पोलीस पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणेबाबत पथकास आदेश दिले.
पथकाने लागलीच दिनांक 12/02/24 रोजी पंचासह भिस्तबाग महाल, सावेडी परिसर या ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता 11.30 वा. चे सुमारास 03 संशयीत इसम भिस्तबाग महालासमोर शाईन मोटारसायकलवर येवुन थांबले. पथकातील अधिकारी व अंमलदार असे संशयीत इसमांना ताब्यात घेण्यासाठी जात असतांना त्यांना पोलीस आल्याचा संशय आल्याने त्यांनी त्यांचेकडील मोटारसायकल चालु करुन ते पळुन जाण्याचे तयारीत असतांना दोन इसमांना जागीच पकडले. व एका इसमाचा पाठलाग करुन पकडण्यात आले. ताब्यात घेतलेल्या तिनही इसमांकडे चौकशी करता त्यांनी त्यांची नावे 1) लखन भाऊसाहेब आल्हाट वय 32 वर्षे, रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर, 2) लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे रा. मोरया, चिंचोरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर, 3) अविनाश उर्फ देविदास उर्फ आबा विक्रम उर्फ विक्रांत आल्हाट रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये 30,000/- रुपये किमतीचा गावठी कट्टा, 1000/- रुपये किमतीचे 02 जिवंत काडतुसे, व 70,000/- रुपये किमतीची विनानंबरची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल असा 1,01,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द 1) तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 154/2024 आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे लखन भाऊसाहेब आल्हाट हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर, छ. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न, फसवणुक, दुखापत, विनयभंग, अवैध शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण – 06 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. सोनई 298/2022 भादवि कलम 307, 324, 506,
आर्म ऍ़क्ट 3/25
2. सोनई 352/2021 भादवि कलम 307, 324 आर्म ऍ़क्ट 4/25
3. सोनई 60/2014 आर्म ऍ़क्ट 4/25
4. सोनई 136/2017 भादवि कलम 324, 323, 504, 506
5. राहुरी 892/2018 भादवि कलम 420, 406, 34
6. सातारा खंडोबा, छ. संभाजीनगर 113/2017 भादवि कलम 354, 325,323
आरोपी नामे लखन सुधाकर सरोदे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये फसवणुक व अवैध शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे 3 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. कोतवाली 258/2013 भादवि कलम 420, 468, 471, 34
2. कोतवाली 277/2014 भादवि कलम 420, 465, 467, 468, 469, 471, 34
3. एम.आय.डी.सी. 111/2024 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 (फरार)
आरोपी नामे अविनाश विक्रम आल्हाट हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न व चोरी असे गंभीर स्वरुपाचे 2 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. शनिशिंगणापुर 26/2016 भादवि कलम 379, 34
2. सोनई 298/2022 भादवि कलम 307, 324, 506, 427, 34 आर्म ऍ़क्ट 3/25 (फरार)
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. अमोल भारती साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.