संपादकीय
Trending

पैसे कमवणा-या पेक्षा बचत करणारा लवकर मोठा होतो- महंत सुनिलगीरीजी महाराज.श्री सावता अर्बन मल्टीपर्पज निधी लि.चा दुतीय वर्धापनदिन साजरा

संतोष औताडे (मुख्य संपादक – नेवासा) दिनांक- 01/11/2022 


सविस्तर माहिती- नेवासा फाटा येथील श्री सावता अर्बन मल्टीपर्पज निधी लि.मुकिंदपुर चा दुतीय वर्धापनदिन दिन आज दिनांक 01/11/2022 रोजी सकाळी दहा वाजता महंत श्री सुनीलगीरीजी महाराज यांच्या शुभ आशिर्वादाने संपन्न झाला. महंत सुनिलगीरीजी महाराज यांनी जीवणात पाच गुण महत्त्वाचे आहे असे सांगितले .विद्या- आपण ज्या शेञात काम करतो त्याचे सखोल ज्ञान असायला हवे. विवेक- खरं -खोटं, चांगले -वाईट, आपलं- परक, हे कळलं पाहिजे.  प्रयत्न- प्रयत्नाअंती परमेश्वर जो प्रयत्न करतो त्याला यश आपोआप मिळते. कौशल्य- काम करतांना शक्ती आणि युक्ती यांचा वापर करता आला पाहिजे.जो शक्ती आणि युक्ती चा वापर करतो त्याला कोणतही अडचण येत नाही.व्याप कितीही कष्ट झाले तरी खचुन जाता कामा नये. हे पाच गुण आत्मसात केले तर आपले भाग्य बदलायला वेळ लागत नाही . पैसे कमावणा-या पेक्षा बचत करणारा लवकर मोठा होता असेही महंत सुनीलगीरीजी महाराज यांनी सांगितले.या वर्धापनदिन प्रसंगी चेअरमन राजेंद्र जावळे यांनी सांगितले की लवकरच आपल्या शाखेची वाटचाल दोन कोटी रुपये ठेवी कडे होणार आहे. ठेवीदारांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही असेही सांगितले. या वर्धापनदिन प्रसंगी महंत सुनीलगीरीजी महाराज,अंबाडे भाऊसाहेब, बनसोडे साहेब,भवर साहेब ,आण्णा पेचे, बाळासाहेब सुकाळकर, बर्वे सर, कृष्णा गव्हाणे, संतोष औताडे (पञकार), अॅड.अडसुरे, विक्रम शिंदे, विशाल शेंडगे, ललिता जावळे, गायकवाड साहेब, विकी रोकडे, गौरव बेहळे, गोरक्षनाथ बेहळे तसेच परिसरातील नागरिक, ठेवीदार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री सावता अर्बन मल्टीपर्पज निधी लि. चे चेअरमन श्री राजेंद्र जावळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करून उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे