नाशिक येथे बस जळुन खाक 11 जणांचा होरपळून मृत्यू जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

संतोष औताडे (मुख्य संपादक नेवासा ) दिनांक -08/10/2022
सविस्तर माहिती-झोपेत असतानाच औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी पहाटे सव्वा पाच वाजता धडक झाली व अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने 11 प्रवासी होरपळून जागीच मृत्यू पावले तर 28 वर प्रवासी जखमी झाले आहेत . ही बस यवतमाळ येथून मुंबईकडे जात असल्याचे सांगण्यात आले . अर्धा तास आग सुरू होती. घटनास्थळी अग्निशमन दलाची तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. नाशिकमध्ये झालेल्या बस अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली. ते स्वतः दुपारी 1 वाजता नाशिकमध्ये अपघातस्थळी दाखल झाले. अपघात झालेल्या ठिकाणी भेट देत त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातग्रस्त होऊन आगीत कोळसा झालेली बसची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पोलिसांनी अपघातानंतर केलेल्या पंचनाम्यातून काय माहिती समोर आली आहे, हे त्यांनी जाणून घेतलं.
या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जातेय.
जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपेक्षेपेक्षा जास्त प्रवाशी बसमध्ये असल्याचंही दिसून आलंय. त्यामुळे या बसवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. अपघातानंतर लागलेल्या आगीत ही बस पूर्णपणे जळून खाक झाली. राज्यातील रस्ते अपघातांचा प्रश्न या भीषण दुर्घटनेनं पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.अपघातस्थळी हजर असलेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने 100, नंबर 112, रुग्णवाहिका 108, अग्निशमन दला आपत्कालीन व्यवस्था या ठिकाणी संपर्क साधला. परंतू 6 वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही.घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर जखमींना आणि मृतांनाही शहर बस मधून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.