नेवासा शहरात पोलिसांकडून केलेल्या सरप्राईज नाकाबंदीत चोरी गेलेली एक मोटारसायकल हस्तगत.

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा, दिनांक -24/09/2024
सविस्तर माहिती- नेवासा शहरात वाढत्या चो-या आणि गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी सायंकाळी 5 वाजता नेवासा ते नेवासा फाटा रोडवर सरप्राईज नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी करून नेवासा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव साहेब यांनी गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा घालण्याचा प्रयत्न केला. शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. नेवासा न्यायालयातुन विजय चेंगडे (व्यावसाय वकिली) नेवासा यांची चोरी गेलेली मोटारसायकल 20,000/- रुपये किंमतीची एक एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल तिचा आर.टी.ओ
पासिंग क्रमांक एम.एच. 17 ए.एक्स 1592, इंजिन नंबर HA11EFD9E42893
व चेसी नंबर MBLHA11EWD9E01388 असा असलेली जु. वा. किं.अं.
20,000/- रु. एकुण
येणेप्रमाणे वरील वर्णनाची व किंमतीची मोटार सायकल क्रमांक एम. एच. 17 ए . एक्स 1592
ही दिनांक 21/09/2024 रोजी दुपारी 2.50 वा. ते 4.00 वा. चे दरम्यान नेवासा कोर्ट वकील बार येथुन चोरी गेली होती. याबद्दल नेवासा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली होती.पोलिसांकडून मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपींचा शोध सुरू होता . दरम्यान नेवासा शहरात मोठी घटना घडल्यास नाकाबंदी केली जाते. मात्र आज अचानक नाकाबंदी करून गुन्हेगार सापडतील किंवा संशयित ताब्यात घेता येतील काय याची चाचपणी नेवासा पोलिसांनी केली. अनेक चौकात वाहनांची तपासणी करण्यात आली. यातच ही चोरी गेलेली मोटारसायकल मिळुन आली. बाळु विठ्ठल देवकर रा.फुलंब्री , जिल्हा.संभाजीनगर नामे आरोपी ला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. काही दुचाकी वाहनांवर क्रमांक नव्हते, तर काही वाहनचालकां जवळ कागदपत्र नव्हते. .या नाकाबंदीतमधे 5 अधिकारी, 21 पोलिस अंमलदार, 32 होमगार्ड सहभागी झाले होते . पोलिस निरीक्षक धनंजय जाधव साहेब या नाकाबंदी दरम्यान लक्ष ठेवून होते. वाहनचालकांना पोलिसांनी कडक तंबी दिली. तर ट्रिपल सीट जाणा-या वाहनधारकांना समज देऊन सोडण्यात आले. यापुढील काळातही अशीच कारवाई केली जाईल असे नेवासा पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.